Veg kebab : कच्च्या केळांचा कबाब कसा कराल? | पुढारी

Veg kebab : कच्च्या केळांचा कबाब कसा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात भारतीय पदार्थ खूप गाजतात. कारण, आपल्या देशात विविधताच इतकी आहे की, अन्नपदार्थ त्याला अपवाद असू शकत नाहीत. असे पदार्थ एखाद्या ठिकाणाची ओळख होऊन जातात. तिथं खवय्यांची गर्दी होताना दिसते. आज असाच एक अपवादात्मक पदार्थ आपण पाहणार आहोत तो म्हणजे ‘कच्च्या केळ्यांचा कबाब’. (Veg kebab) तर हे कबाब कसे करतात हे पाहू…

साहित्य

१) तीन कच्ची केळी

२) दोन मध्यम आकाराचे बटाटे

३) तीन चमचे आले-लसूण पेस्ट

४) तीन चमचे काश्मिरी मिरची पेस्ट

५) शंभर ग्रॅम पनीर

६) चवीनुसार मीठ

७) चार चमचे कॉर्नफ्लोअर

७) चिरलेली कोथिंबीर

८) रस्सा करण्यासाठी ४ टोमॅटो आणि कांदे

कृती

१) पहिल्यांदा प्रथम कच्ची केळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. नंतर ते गरम-गरम कुस्करून घ्यावेत.

२) नंतर त्यात मिरची, आलं-लसणाची पेस्ट, मीठ, कोथिंबीर, किसलेलं पनीर, काॅर्नफ्लोअर यांची चांगलं मिश्रण होईल, असं मळून घ्यावं. त्याचे कबाब लांब आकार करून घ्या.

२) त्यानंतर गॅसवर कढई ठेवून तेल उकळून घ्यावे, नंतर त्यात सर्व कबाब व्यवस्थित तळून द्यावे.

३) अर्धी वाटी तेल घेऊन दोन चमचे आलं-लसणाचे पेस्ट, दोन चमचे काश्मिरी मिरचीचे वाटण घालून परतून घ्या.

४) त्यावर वाटलेले टोमॅटो-कांदा घालून तेही तेल परतून घ्या. नंतर त्यात थोडं पाणी टाकून उकळून घ्या. त्याची ग्रेव्ही घट्ट तयार होते.

५) चार एकत्र वाटून, काजूचं वाटण दोन चमचे, मीठ, तेल. नंतर त्यात तळलेले कबाब घालून लगेच खाली उतरवावी. थोडा वेळ तसंच ठेवावं म्हणजे भाजीत रस छान जिरतो.

अशाप्रकार कच्च्या केळांचा कबाब मसाला तयार झाला आहे. तुमच्या आवडीनुसार थोडे तळलेले काजू, चेरी, किसलेलं पनीर, कोथिंबीर घालून सजवावं. हा गरम गरम ‘कबाब मसाला’ पोळी, पराठा याबरोबर टेस्टी लागतो.

या रेसिपी वाचल्या का ?

Back to top button