File Photo  
Latest

Gold Price Today : सोने-चांदी दरात तेजी, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा भाव

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सलग दोन दिवस दरात घसरण झाल्यानंतर आज शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) सोने- चांदीला (Gold Price Today) काही प्रमाणात झळाळी मिळाली. सराफा बाजारात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी २४ कॅरेट सोने २६८ रुपयांनी महागले. यामुळे सोन्याचा (Gold Price Today) प्रति १० ग्रॅमचा दर ४७,६१८ रुपयांवर पोहोचला. तसेच चांदीच्या दरातदेखील काही प्रमाणात तेजी दिसून आली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोने ४७,६१८ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,४२७ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,६१८ रुपये, १८ कॅरेट सोने ३५,७१४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,८५७ रुपये होता.

तर प्रति किलो चांदीचा दर १४२ रुपयांनी वाढून ६३,३७२ रुपयांवर पोहोचला आहे.

gold file photo

गेल्या वर्षी सोने उच्चांकी पातळीवर म्हणजे ५६ हजारांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचले होते. सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ हजार रुपयांनी कमी आहे.

सोने चालू महिन्यात ४५,६०० रुपयांवर आले होते. गेल्या चार महिन्यांतील हा निच्चांकी दर आहे. पण आता सोने दरात सुधारणा होत आहे.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोन्याच्या शुद्धतेवरुन सरकार गंभीर विचार करत आहे. त्यासाठी सोने वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेला हॉलमार्किंग म्हटले जाते. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना सोने शुद्ध असल्याचे कळते.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

२४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने असते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT