

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मर्सिडिज बेंझ AMG GLE 63 S 4 MATIC + Coupe भारतात लाँच केली आहे. SUV प्रकारातील ही कार मर्सिडिज गाडीची भारतातील सर्वांत वेगवान कार आहे. या कारची किंमत २ कोटींच्यावर आहे.
अधिक वाचा –
० ते १०० किलोमीटर प्रति तास हा वेग गाठण्यासाठी ३.८ सेंकदा इतका कमी वेळ ही कार घेते. त्यामुळे बेंझच्या भारतातील कारमधील ही सर्वांत वेगवान कार ठरते. AMG प्रकारातील ही भारतातील १२वी कार आहे.
अधिक वाचा –
या प्रकारातील ४.० लिटरचे इंजिन या कारमध्ये आहे. 48 व्होल्ट EQ बूस्ट हायब्रीड सिस्टम असलेली ही पहिली कार आहे. यामुळे या कारला जास्तीचा २५० NM टॉर्क आणि २२ HP ची शक्ती मिळते. याशिवाय कारची इंधन कार्यक्षमताही मोठ्या प्रमाणावर सुधारण्यात आलेली आहे.
अधिक वाचा –
तसेच कारच्या डिझाईनमध्ये ही मोठे बदला पाहायला मिळतात. SUV प्रकारातील ही कार मर्सिडिज गाडीची भारतातील सर्वांत वेगवान कार आहे.
हेदेखील वाचा-