गोवा

Social media : स्वतःच काढून घेतले अब्रूचे धिंडवडे

मोनिका क्षीरसागर

पुढारी वृत्तसेवा, मडगाव : समाज माध्यमांच्या अतिरेकामुळे एका युवकाचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अश्‍लील व्हिडीओच्या आहारी जाऊन कुडचडे आणि परिसरातील एका युवकाने स्वतःचाच अश्‍लील व्हिडीओ ' त्या' कथित मैत्रिणीला पाठवून अब्रूचे धिंदवडे काढून घेतले. यामुळे त्या युवकाचे पुरते 'वस्त्रहरण' झाल्याची चर्चा आहे.

समाज माध्यमावरील एका अश्‍लील साईटवर त्याने एका महिलेला आपला अश्‍लील व्हिडिओ दाखवला होता. त्या साईटवर तो व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आला. व्हायरल न करण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने मागणी धुडकावल्याने त्या साईटवर त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, असे परिसरात बोलले जाते. तेव्हापासून युवक तणावाखाली आहे. तो वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर कामाला असल्याचे काहीजण चर्चा करतात. हा युवक फसव्या साईटच्या जाळ्यात अडकला. त्या माध्यमातून एका विदेशी महिलेशी मैत्री केली. व्हिडिओ चॅट दरम्यान त्याने तिचे अश्‍लील व्हिडीओ दाखवण्याचा आग्रह केला. ऑनलाईन पध्दतीने तिला पैसेही पाठवले. पण तिनेही याला 'सेम टू यू' केले आणि इथेच तो फसला. तिने केलेल्या मागण्या पूर्ण करत याचे कधी 'वस्त्रहरण' झाले हे याच्याही लक्षात आले नाही.

दरम्यान, वस्त्रहरणानंतर तिने सर्व व्हिडीओ आपल्या स्क्रिनवर रिकॉर्ड केला. हा व्हिडिओ जाहीर करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेलचा प्रयत्न झाल्यानंतर आपण पुरते फसल्याचे त्याला कळून चुकले. तो पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानंतर त्या साईटवर त्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्याचे काहीजण बोलतात. हा प्रकार परिसरात कर्णोपकर्णी झाला. परंतु पोलिस स्थानकात या प्रकरणाची कोणतीही तक्रार नोंद झालेली नाही. तो मात्र हतबल होऊन मनःस्ताप करत बसल्याची चर्चा आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT