गोवा

गोवा : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; पत्नी गंभीर

अनुराधा कोरवी

फोंडा ः पुढारी वृत्तसेवा : फर्मागुढी येथील जीव्हीएम महाविद्यालयाजवळील सर्कलच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास अवजड ट्रक व मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक अर्जुन लक्ष्मण नाईक (47) हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी अनुष्का अर्जुन नाईक (35) या गंभीर जखमी झाल्या. दोघेही मूळ धाऊसवाडा – वेंगुर्ला येथील रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य कुंकळ्ये – फोंडा येथे होते.

मयत अर्जुन नाईक हे मूळचे भाईंदर – ठाणे मुंबई येथील असले तरी धाऊसवाडा – वेंगुर्ला येथे राहत होते. कामानिमित्त हे दाम्पत्य फोंडा- कुंकळ्ये येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. अर्जुन फोंड्यातील एका खासगी आस्थापनात कामाला होते. शुक्रवारी संध्याकाळी अर्जुन व त्यांच्या पत्नी अनुष्का यांनी फोंड्यात बाजारहाट केला व रात्री एमएच07 एए 1643 या दुचाकीवरून ते घरी परतत होते.

फर्मागुढी सर्कलवर समोरून येणार्‍या जीए08 व्ही 0652 या क्रमांकाच्या अवजड ट्रकने त्यांना धडक दिली. त्यावेळी दुचाकी ट्रकने फरफटत नेल्याने दुचाकीचालक अर्जुन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी अनुष्का गंभीर जखमी असून त्यांना बांबोळी इस्पितळात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक सागर दिना नाईक (42, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. पंचवाडी – शिरोडा) याला फोंडा पोलिसांनी अटक केली. फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आई-वडील परतण्याची आस

नाईक दाम्पत्याला दोन लहान मुली आहेत. आई-वडील बाजाराला गेले असून आता ते परतणार, या आशेवरच या दोन्ही मुली घरात होत्या. पण काळाने घाला घातल्याने या दोन्ही मुलींचे पित्याचे छत्रच हरपले असून आईही गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असल्याची माहिती निरीक्षकांनी दिली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT