पुढारी ऑनलाईन डेस्क
रशियाने युक्रेनवर हल्ला केलाय. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोमध्ये पोहोचले. त्यावेळचा इम्रान खान आणि पुतीन यांचा एक फोटो समोर आलाय. (Imran Khan Meet Vladimir Putin) दोघांच्या भेटीपेक्षा या फोटोचीच चर्चा अधिक रंगलीय. (Imran Khan Meet Vladimir Putin) या फोटोतील टेबल हे त्यामागचे कारण आहे. या टेबलाची इतकी चर्चा का रंगलीय, हे पाहुया.
इम्रान खान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या या फोटोची चर्चा जोरदार रंगली आहे. या दोघांच्यामध्ये एक टेबल आहे. या टेबलावर एक पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते. पण, या टेबलाच्या आकारावरून मात्र खूप चर्चा रंगलेली दिसतेय.
इतर देशांच्या प्रमुखांना भेटताना पुतीन हे मोठ्या गोलाकार टेबलचा वापर करतात. पण, पाकिस्तासोबत भेटीत हे एकदम छोटे टेबल होते. त्यामुळे हा बदल सर्वांच्या नजरेत आलाय. त्याचे राजकीय अर्थदेखील काढले जात आहेत. पाकिस्तान आणि रशिया यांच्यात खरचं संबंध वाढत चालले आहेत, असे अनेकांना वाटत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन रशियाच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पुतीन आणि त्यांच्या भेटीत हेच मोठे टेबल होते. तेव्हादेखील एका लांबलचक टेबलाची चर्चा झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमध्ये वाढत चाललेले अंतर असे म्हटले गेले होते. आता छोट्या टेबलचा फोटो देखील व्हायरल झालाय. जर हे खरे आहे तर भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे भारताचे टेन्शन वाढणार का? असे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.