Latest

Evelyn Sharma : एवलिन शर्माने दिला मुलीला जन्म

सोनाली जाधव

बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा (Evelyn Sharma) हिने मुलीला जन्म दिला आहे. ये जवानी हैं दिवानी या चित्रपटातून घराघरात पोहचलेल्या एवलिन शर्माने आपल्या चिमुकलीसह फोटो सोशल मीडियीवर शेअर करत हि गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे. एवलिनवर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे. एवलिनचा आणि तिच्या बाळाचा  फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

सुंदर भूमिकेत (Evelyn Sharma)

एवलिनने आपल्या बाळाला मिठीत घेतलेला हा फोटो चाहत्यांना खूप भावला आहे. एवलिनने या फोटाला ' मी माझ्या आयुष्यातील सुंदर भूमिकेत…' अशी सुंदर कॅप्शन दिली आहे. आणि #MOMMY असही दिले आहे. एवलिन  आपल्या आयुष्यातील या नवीन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.

लेकीच इन्स्टाग्राम

एवलिन आपल्या आयुष्यातील या नवीन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने आपल्या चिमुकलीच इन्स्टाग्राम अकाउंट ही काढले आहे. तिने या अकाउंटवर  एक फोटोही शेअर केला आहे.

एवलिन शर्माने यावर्षी १५ मे रोजी डेंटल सर्जन असलेल्या तुषार भिंडीशी लग्न केले होते. एवलिन आणि तुषार यांची पहिली भेट २०१८ मध्ये त्यांच्या मित्रांनी घडवून आणली होती. त्यानंतर त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१९ साली तुषार भिंडीने सिडनीच्या हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते.

एवलिन आणि तुषारने आपण आई-बाबा होणार आहे.. ही गुड न्युजही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. काही दिवसांपूर्वी एवलिन आणि तुषारने ऑस्ट्रोलियात आपल्या घराजवळ बाळासाठी बागही तयार केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT