Relationship : जीवनात "तू बोअर आहेस" हे वाक्य सुरुंग ठरेल!  | पुढारी

Relationship : जीवनात "तू बोअर आहेस" हे वाक्य सुरुंग ठरेल! 

मृदुल, पुढारी ऑनलाईन डेस्क

“तू बोअर आहेस”, हे वाक्य ऐकताना अगदी साधं दिसतंय. पण, हे वाक्य नवविवाहित नात्यामध्ये (Relationship) जर बाई पुरुषाला म्हणाली किंवा पुरुष बाईला म्हणाला तर? त्याची ग्रॅव्हिटीच बदलते! अशावेळी ‘बोअर’ या एकाच शब्दाच्या खूप छटा असू शकतात, खूप डायमेंशन्स असू शकतात. ज्यांचे अर्थ अलगद उलगडावे लागतील. बघा ‘बोअर’ हा शब्द हार्मलेस वाटतो. पण, त्याला खूप सिरीयसली घ्यायला हवं. आताची पिढी पहिली तर, बहुतेकदा शाळेमध्ये असतानाच मुला-मुलींची प्रेमप्रकरण जुळतात. ती कॉलेजला जाईपर्यंत मिटूनही जातात. नंतर कॉलेजला पुन्हा नव्या मुलीवर किंवा मुलावर प्रेम जडतं. तिही पुन्हा मिटून जातात. लग्नाच्या वयापर्यंत किमान ३ ते ४ बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड झालेले असतात. मग नोकरी, करिअर आणि मग लग्नाची वेळ येते.

Relationship

प्रकरण पहिलं

निशा. हिचं वय २७ वर्षं. श्रीमंता घराची लेक. उच्च शिक्षित. खानदानी. सुशिक्षित घरातली. अर्थात त्या तोलामोलाचाच मुलगा तिच्यासाठी पाहिला जातो. ते बघताना आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक संबंध, शिक्षण, देखणेपणा हे सर्व बघून मुलगा ठरवला. त्यामुळे दोघांनी (Relationship) एकत्र फिरून एकमेकांबद्दल जाणून घेण्याची फार वेळ आलेली नव्हती. लग्न धुमधडाक्यात झालं. भरपूर वस्तू, दागिने घेऊन आलेली ही सून लगेच स्वीकारली गेली. हनिमून झालं आणि जेव्हा जास्त काळ एकत्र राहण्याची वेळ आली तेव्हा या नवविवाहित जोडप्याला लागलं की, ‘काहीतरी राहून जातंय’. रवी तिचा नवरा. लग्नापूर्वी त्याच्या ४ गर्लफ्रेंड झाल्याला होत्या. निशाचेही २ बाॅयफ्रेंड झालेले होते. या बाबतीत दोघांच्यातही स्पष्ट बोलणं झालं होतं. तरीही दोघांनीही एकमेकांना स्वीकारला होतं.

पण नंतर लक्षात आलं की, रवी चेन स्मोकर आहे. निशा खूपदा ड्रिंक्स घेते. जुन्या मित्र मैत्रिणींशी दोघेही आजसुद्धा संबंध ठेऊन आहेत. चॅट करतात आणि भेटतातही. हे दोघे मुद्दाम एकत्र वेळ घालवायचा प्रयत्न करतही असतात. पण एक दिवस निशा रवीला म्हणते, “शी! तू एकदम बोअर आहेस” रवीला राग येतो. पण त्याला त्याची ग्रॅव्हिटी समजलेली नसते. निशा खूपच उत्फुल्लीत, आऊटस्पोकन तर रवी बऱ्यापैकी गंभीर, कमी बोलणारा. त्यामुळे त्याचा समज होतो की, कदाचित त्यामुळे निशा असं म्हणत असावी.

पण वस्तुस्थिती अशी की, निशाच्या आयुष्यात या आधी २ बाॅयफ्रेंड आलेले होते. ज्यात तिला उत्तम सहजीवन कसं असावं याची ओळख करून देणारा एक सहचर मिळालेला होता. दोघांचं एकमेकांत छान जुळलंही होतं. इतकंच काय बेडवरही उत्तम जमलं होतं. त्यामुळे एक छान नातं काय असू शकेल हा अनुभव तिला होता. मात्र, आता सगळं परफेक्ट मिळूनही रवी सगळ्याच बाबतीत तिला मिळमिळीत वाटत होता. तिच्या ‘बोअर’ आहेस म्हणण्यात हे सगळं अभिप्रेत होतं.

Relationship

प्रकरण दुसरं

अजय मध्यमवर्गीय घरातला. सर्वसाधारण मुलं असतात तसाच. आर्किटेक्ट, लग्नाच्या वेळी मुलगी पहिली ती अगदी सारख्याच क्षेत्रातली. दिसायला उजवी. ती कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली. बाकी सगळं छान जमलेलं. पण तिचं फ्रेंड सर्कल अजयपेक्षा वेगळं. हे सगळे जरा मोड राहणारे, फंकी टाईप. किमया त्याची बायको पण अशीच टकाटक राहणारी. अजयला शास्त्रीय संगीत आवडायचं, तिला संगीताची आवड नव्हतीच. तिला फिल्म्स, नाटक, शॉपिंग आवडायचं ज्यात याला रस नव्हता. तरीही दोघांनी एडजस्ट केलं. किमया बेडवर आक्रमक आणि तिला नवराही तसाच हवा होता. मात्र, अजय हा त्या मानाने मवाळ. हनिमून नंतरच्या काही दिवसांत जेव्हा एक फिल्मला जाण्यावरून दोघात वाद झाला. तेव्हा अजय पटकन म्हणाला, “तू एक सर्वसामान्य बायकांसारखी असणारी ‘बोअर’ बाई आहेस.” आता त्याच्या या ‘बोअर’मध्ये त्याच्या दृष्टिकोनातून उणिवा असलेली वैशिष्ट्यं असं अभिप्रेत आहे.

Relationship

प्रकरण तिसरं

मधुरा एक इंजिनिअर. लव्ह मॅरेज. नवरा कॉलेजमध्ये भेटलेला. स्वप्नील त्याचं नाव. दोघांची परिस्थिती उच्च मध्यम वर्ग. साधारण सारखं वातावरण. घरच्यांनी सहजच परवानगी दिलेली. त्यामुळे हसत खेळत लग्न, एक वर्षानंतर लक्षात यायला लागलं. स्वप्नील रसिक होता. त्याला रोमान्स, सेक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. त्याच्या तुलनेत मधुरा जरा कमी. स्वप्नीलला ड्रिंक्स घेण्याची आवड होती, त्यामुळे तिनं कंपनी द्यावी असंही त्याला वाटायचं. पण तिला ते बिल्कुल नाही आवडायचं. तरीपण दोघांनी छान जमवून घेतलं. दोघे एकदा दुसऱ्या कपल मित्र मैत्रिणीबरोबर (Relationship) गोव्याला जायला निघाले. वाटेत स्वप्नीलने तिला विचारलं की, “बिकिनी आहे का तुझ्याकडे? नाहीतर आपण घेऊया.” मधुराला ही कल्पना पण सहन झाली नाही. तिने स्पष्ट नकार दिला. घरी परत आल्यावर काही दिवसांत छोट्या कारणांवरून दोघात वाद झाले. तेव्हा स्वप्नील म्हणाला की, “काय हे? तुझं वय काय… तू कशी वागतेस प्रौढ माणसासारखी. त्यापेक्षा ती दोघे बघ कसं लाईफ एन्जाॅय करतात. You are a boring personality.” इथे स्वप्नीलच्या ‘बोअर’ची छटा वेगळी आहे.

Relationship

दोन्हीकडून जुळवून घ्यायला हवं

आता बघा असं आहे की, आजकाल हे असं खूप जोडप्यांमध्ये (Relationship) दिसतं. लग्नानंतरच्या ३ वर्षांत. जोडीचं जमत नसतं. अनेक बाबतीत आणि बेडवरसुद्धा. मात्र, त्यांना नेमकं काय होतंय, याचं नीट विश्लेषण करायला जमत नाही. आणि ते एकच शब्द वापरून आपला प्रॉब्लेम सांगतात की, “पार्टनर बोअर आहे.” अनेक बाबतीत विरुद्ध असाल तर जमणं नक्कीच अवघड असतं. आजकाल लवकर झालेल्या प्रेम प्रकरणांमध्ये सेक्स लाईफ खूप आधीपासून अनुभवलेलं असणं, भरमसाठ करमणुकीची साधनं, व्यसनं, पायावर भक्कम उभं असणं या सगळ्यांमुळे मिळालेल्या जोडीदाराशी जमवून घेणं हा एक मोठा टास्क आहे. याच मुख्य कारण हे की सेक्स लाईफ आधीच अनुभवल्यामुळे त्या बद्दलचे पॅरामिटर्स मनात असतात. त्यातून अपेक्षा असतात, काय छान, काय नाही हे मनातून माहीत असते. जुने मित्रमैत्रिणी सहज पुन्हा उपलब्ध होतात. त्यामुळे आता जो जोडीदार येईल त्याच्याकडे काही विशेष असेल तरच आकर्षण वाटेल अन्यथा पार्टनर बोअर वाटतो.

मूळात छान मैत्री (Relationship) जमली, ओढ वाटली, प्रेम असेल तरच जोडप्याचा बेडवर जमेल. पण तो वेळ तरी द्यायला जायला हवा. याच आणखी एक मुख्य कारण हे की, लग्न आजही घर, खानदान, शिक्षण , करिअर ओळखी या गोष्टी बघून ठरवली जातात. खरंतर जोडीचं मूळात काही जमतंय का? हे पाहून लग्नं व्हायला हवी. लग्नानंतरच्या काळातली २ वर्षं ही जोडप्यांसाठी स्पेशल असतात. त्यात त्यांनी जास्तीत जास्त वेळ एकमेकांना द्यायला हवा. गप्पा मारायला हव्या. फिरावं. जाणून घ्यावं. करण घट्ट बंध जुळतात. पण नातं जुळायला कधी वेळही द्यावा लागतो. काही सवयी आवडी बदलता येतात, मोल्ड होता येतं. कारण वय लहान असतं. मात्र, ही इच्छा दोन्हीकडून हवी. स्वतःच्या पायावर उभे असणं. सेक्श्युअल अनुभव, सहज उपलब्धता या गोष्टी कधीतरी मारक ठरतात. कारण कोणी कुणाचं आणि का ऐकायचं, अस दोघांना वाटू शकतं. म्हणूनच “तू बोअर आहेस”, असं जेव्हाही कधी कोणी कुणाला म्हणेल. तेव्हा ते कॅज्यूअली न घेता गांभीर्याने घ्यायला हवं. आणि नात्याला वेळ देऊन एकमेकांत खुल्या गप्पा व्हायला हव्यात. जुळवायचं आहे हे दोन्हीकडून असेल तर जुळेल. नाहीतर “तू बोअर आहेस” हे वाक्य सुरुंग ठरेल!

हे वाचा…

Back to top button