लॉटरीची तिकिटं विकणाऱ्या Nora Fatehi चं 'कुसू कुसू' गाणं कोटींच्या घरात कसं पोहोचलं? | पुढारी

लॉटरीची तिकिटं विकणाऱ्या Nora Fatehi चं 'कुसू कुसू' गाणं कोटींच्या घरात कसं पोहोचलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिलबर गाण्यात आपल्या दिलकश अदा दाखवणारी नोरा फतेही (Nora Fatehi) आता ‘सत्यमेव जयते-२’ मध्ये कुसू कुसू गाण्यात दिसलीय. तिचे या गाण्यात सिझलिंग हॉट मुव्ह्ज आहेत. या गाण्याच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते-२’मध्ये ग्लॅमरचा तडका लावला आहे. गाण्यात तिची एक आणि एक अदा लक्ष वेधून घेणारी आहे. यामध्ये ती बोल्ड आणि सुंदर दिसतेच. शिवाय, गाण्याचे बीट्स आणि तिच्या डान्सचे मुव्ह्ज कमालीचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, लॉटरीचे तिकिट विकणाऱ्या नोरा फतेहीने भारतात येऊन एक वेगळी उंची गाठलीय. तिच्या यशाचं माप तिच्या मेहनतीनेचं केलं जाऊ शकतं. वाचा तिच्याविषयी या सुंदर गोष्टी.(Nora Fatehi)

तिचे सत्यमेव जयते-२ या चित्रपटातील कुसू कुसू हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला कोटींच्या घरात Viewers आहेत. ती या गाण्यात पुन्हा एकदा बॅले डान्स करताना दिसतेय. क्रीम कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये नोरा खूप हॉट दिसत आहे. तिच्या दिलकश अदा पाहून तिच्यावरून नजर हटता हटत नाही.

या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे फतेहीचा जॉनसोबत हा तिसरा चित्रपट आहे. रॉकी हॅण्डसम या चित्रपटातील रॉक द पार्टी या गाण्यातदेखील फतेही आणि जॉन एकत्र दिसले होते. त्यानंतर ‘सत्यमेव जयते’मध्ये दिलबर या गाण्यातही ते दिसले होते.

तुम्हाला माहितीये का? नोरा कॅनडामध्ये लॉटरीचे तिकिट विकायची. त्यानंतर तिने अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्यादेखील केल्या. पण, नशीब उघडलं ते भारतातचं. भारतात आली आणि बॉलिवूडची ‘आयटम गर्ल’ झाली.

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही (Nora Fatehi) ने चित्रपट इंडस्ट्रीत २०१४ रोजी पदार्पण केलं होत. परंतु, त्यावेळी तिला कुणीही ओळखत नव्हतं. तेलुगू चित्रपट रोरमध्ये नोराने काम केले होते. परंतु, त्याआधी नोराला संघर्षातून जावं लागलं होतं. काही एजन्सीनं तिला धोकाही दिला. नोरा आपल्यासोबत केवळ ५ हजार रुपये घेऊन कॅनडातून भारतात आली होती.

आपल्‍या दिलकश अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी बॅले डान्‍सर, अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. ती उत्तम डान्‍सर आहे. एकेकाळी ती कॅनडामध्‍ये लॉटरीचे तिकिट विकायची. तिने कॉफी शॉपमध्‍येही काम केले आहे. छोट्‍या-मोठ्‍या कामातून तिने सिनेसृष्‍टीपर्यंत मजल मारली. तिच्‍या या मेहनतीचे कौतुक करावे, तितके थोडेच आहे.

बॉलिवूडमध्‍ये आपल्‍या सुपर डान्‍स मुव्ह्‍जनी नोरा आज एक वेगळ्‍या उंचीवर पोहोचली आहे. नोरा फतेही मूळची कॅनडाची आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीनुसार, नोरा फतेहीने आपल्‍या आयुष्‍यातील संघर्षाची पाने उलगडली. करिअर करताना सुरुवातीला तिने केलेल्‍या स्ट्रगलबद्‍दल तिने सांगितले होते.

नोराने म्‍हटले होते की, ‘माझी पहिली नोकरी कॅनडातील एका जेंट्स शॉपिंग मॉलमध्‍ये होती. त्‍यावेळी मी शाळेत शिकत होते. तेथे स्टोअरची जबाबदारी देण्‍यात आली होती. मला १ हजार डॉलर पगार मिळत होता.’

नोरा म्‍हणाली, ‘या नोकरीनंतर मला टेलिकॉलरची नोकरी मिळाली. सहा महिने ही नोकरी केली. जॉब होता- लॉटरीचे तिकिट विकण्‍याचा. यामध्‍ये मला पगार आणि कमिशन दोन्‍ही मिळत असे. नंतर मी हा जॉब सोडला. यानंतर मी एका कॉफी शॉपमध्‍ये वेटर्स बनले. येथे मी डबल शिफ्टमध्‍ये काम करत होते. येथे ६ महिने काम केले. या नोकरीमुळे माझी चांगली कमाई होत होती. पुढे मी एक एजन्‍सी जॉईन केली. मला परफॉर्मर बनायचे होते.’

नोरा पुढे म्‍हणाली होती, ‘काही महिन्‍यांनी मला भारतात एका जाहिरातीत काम करण्‍याची संधी मिळाली. सुरुवातीला मला कुठलीही भाषा येत नव्‍हती. काही कालावधीनंतर मला स्‍वत:चा शो होस्ट करण्‍याची आणि डान्‍स करण्‍याची संधी मिळाली.’

‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर-दिलबर’ हे नोराचे आयटम सॉन्‍ग लोकप्रिय झाले होते. या गाण्‍यात तिने बॅले डान्‍स करून भल्‍याभल्‍या डान्‍सर्सना मागे टाकले. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडमध्ये एकानंतर एक हिट सॉन्ग नोराने दिले आहेत. ओ साकी साकी, कमरिया, हाय गर्मी यासारखे अनेक हिट गाण्यांनी नोराने अल्पावधीतचं प्रसिध्दी मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

Back to top button