नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : उच्च शिक्षण घेण्यासाठी सामान्य कुटुंबातील विध्यार्थ्यांना बँक कर्ज Education loan घेण्याची गरज भासते. बहुतेक वेळा कागदपत्र आणि नियमांमुळे बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपण पाठ फिरवतो. तुम्ही उच्च शिक्षण घेणार असला तर आता ICICI बँक तुमच्या मदतीला येणार आहे. उच्च शिक्षणासाठी एक कोटीपर्यंत त्वरीत कर्ज देण्याची योजना बँकेने आखली आहे.
विशेष म्हणजे शैक्षणिक कर्जाची Education loan सर्व प्रक्रिया डिजीटल स्वरुपातील आहे. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला icicibank.com या बँकेच्या संकेतस्थळावरून लॉग इन करता येते.
ICICI बँकेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या उच्च शिक्षणाची काळजी आम्ही करू. तुमचे स्वप्न #ICICIBankInstaEduLoan घेऊन पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला एक कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज त्वरीत मिळू शकते.
bit.ly /3dkJZOH या संकेतस्थळावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल, असे बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या सर्व प्रक्रियेत कोणत्याही पेपर वर्कची गरज भासणार नाही. तसेच हे कर्ज बँकेच्या ग्राहकांसाठी
पूर्व-मंजूर आहे.
जे उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा भारतीय विद्यापीठांमध्ये अर्ज करत आहेत.त्यांच्यासाठी हे इन्स्टा एज्युकेशन कर्ज कोणतेही तारण न घेता मिळू शकते.
बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही विशेष सुविधा दिली आहे.जेणेकरून त्यांना मंजुरीच्या पत्रासाठी पुन्हा पुन्हा कोणत्याही शाखेला खेटे घालावे लागणार नाही.
इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन पद्धतींद्वारे स्वतःच अंतिम स्वीकृती पत्र तयार करू शकणार आहेत.
सर्वात आधी तुम्हाला इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. जर तुम्ही ही ऑफर तपासत असाल तर pre-qualified offers अंतर्गत तपासा, त्यात एज्युकेशन लोन निवडा यानंतर Instant Sanction वर क्लिक करा. सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट करा.
यानंतर प्रोसेसिंग फीसाठी OTP भरा आणि Pay now वर क्लिक करा. काही मिनिटांनंतर तुम्हाला कर्ज मिळेल.
ग्राहक घरीच बसून ऑनलाईन एक्सेस मिळवू शकतात. याचबरोबर विना जामीन कर्ज तुम्हाला ५० लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.
शिक्षण कर्जाला त्याच्या संपूर्ण व्याजावर कलम (80E) अंतर्गत कर लाभ मिळतो. यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
आंतरराष्ट्रीय आणि देशामध्ये किमान १ लाख रुपये कर्ज मिळू शकते.
आंतरराष्ट्रीयसाठी जास्तीत जास्त कर्ज १ कोटी आणि देशांतर्गत ५० लाख रुपये कर्ज मिळण्याची सुविधा आहे. या सुविधेमध्ये जे काम काही दिवसात केले जायचे ते आता फक्त काही मिनिटांत होत आहे.
या सुविधेसाठी तुम्हाला ९.२५ टक्के व्याज दर असेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
हे ही पाहा :