Latest

Bail : आर्यन खानला जामीन मिळताच सुहाना खानची पोस्ट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

ड्रग्‍ज प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने आर्यन खानला जामीन (Bail) मंजूर केला. आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची बहीण सुहाना खानची पोस्ट व्हायरल झालीय. सुहाना खानने एक पोस्ट शेअर केलीय. आता सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. सुहानाने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या फोटोंनी एक कोलाज शेअर केला आहे. त्यांच्या बालपणाचे फोटो या कोलाजमध्ये दिसत आहेत. या कोलाजमधील सर्व फोटोंमध्ये सुहाना-आर्यन शाहरुखसोबत खेळताना दिसत आहेत. सुहाना-आर्यन कॅमेऱ्यासमोर विचित्र एक्सप्रेशन देत आहेत. शाहरुख खानदेखील आपल्या मुलांसोबत खुश आहे. (Bail)

या फोटोसोबत सुहाना खानने एक सुंदर कॅप्शन दिलीय. यामध्ये जाहिर केलंय की, ती भाऊ आणि वडिलांवर खूप प्रेम करते.'आई लव यू.'

शाहरुख खानसोबत आर्यन आणि सुहानाला एककत्र पाहून चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरी स्वत: जेल जाऊन आर्यनला घरी घेऊन जातील. पूजा ददलानी आणि शाहरुखच्या बॉडीगार्डदेखील आर्यनला घरी घेऊन जाण्यासाठी ऑर्थर रोड जेल जाऊ शकतात. असे म्हटले जात आहे की, केवळ शाहरुखचं नव्हे तर गौरी खानच्या आरोग्यावरदेखील या गोष्टींचा परिणाम झालाय. सेशन कोर्टद्वारा जामीन याचिका फेटाळल्यानंतर गौरी खूप चिंतेत होती.

दरम्यान, आर्यनसोबत अरबाज मर्जंट आणि मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्‍यात आलाय. ( Aryan Khan's bail hearing ) मागील तीन दिवस आर्यन खानसह अन्‍य आरोपींच्‍या जामीन अर्जावर मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली होती. दरम्‍यान, निकालाची प्रत आज मिळणार असल्‍याने आर्यन खान शुक्रवारी दि. २९ रोजी आर्थर रोड कारागृहातून बाहेर येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. ड्रग्‍ज पार्टी प्रकरणी गेली २५ दिवस तो जेलमध्येच होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT