नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या मनातील इच्छा असून ते नक्की लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे धर्मराव आत्राम यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
संबधित बातम्या
अजित पवार याच्या नाराजीबाबत धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, अजित पवारांचा नाराजीचा प्रश्न नाही. अगोदरच पालकमंत्री पदाबाबत बोलणं झालेलं होतं. पण त्याला उशीर झाला. चंद्रकांत पाटील नाराज नाहीत, पूर्वी त्यांच्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी होती. आता त्यांना दोन जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री अजित पवारच होणार हे पक्के आहे. देवेंद्र फडणवीस यांना ते साथ देत आहेत. 'समझनेवाले को इशारा काफी है. 'अजित पवार मुख्यमंत्री होणार, आता मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस बोलले त्यानंतर काही विषय नाही.
गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री आमचा हवा हे प्रफुल्ल पटेल यांचे आधीच ठरलं होतं. त्यांनी हा जिल्हा मागून घेतला आहे. शेवटी आम्हाला आमच्या पक्षासोबत महायुतीचं काम करायचे आहे. सध्या शासकीय रुग्णालयात मृत्यू, औषध पुरवठा प्रकरण चर्चेत आहे. औषधांच्या पुरवठा संदर्भात छेडले असता प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधी खरेदी केली जाते. प्राधिकरणच्या माध्यमातून मेडिकलमधील मेडिसीनची खरेदी आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते.
ई टेंडर प्रक्रिया प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाते. मेडिसीनचा तूटवडा नाही. मागील पाच-सहा दिवस सुट्टीचे दिवस होते. खाजगी रुग्णालय सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होते. त्यामुळे अचानकपणे नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात रुग्णसंख्येचा फ्लो वाढला. यात कमी वजनाचे बाळ असल्याने ती घटना घडली आहे. भेसळी विरोधात मोहीम सुरू केलेली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे या चार महिन्यात मोहीम राबवत असून त्यावर अंकुश लावण्यासाठी काम केले जाणार आहे. रेस्टॉरंट असो मिठाई असो प्रत्यक्ष त्या भागात जाऊन कारवाई केली जाणार आहे. असे धर्मरावबाबा म्हणाले आहेत.
विदर्भात सुपारीचा हब आहे. आतापर्यंत २ कोटी २४ लाखांची अवैद्य सुपारी जप्त केली आहे. चंद्रपूर, नागपुरातही कारवाई झालेली आहे. आम्ही अनेक योजनांच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या काळात लावलेली स्थगिती उठविली आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
हेही वाचा :