aishwarya rajinikanth and dhanush 
Latest

Dhanush Divorce : धनुषच्या घटस्फोटावर वडिलांचा मोठा खुलासा, ऐश्वर्या आणि…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ स्टार धनुष मागील काही दिवसांपासून पत्नी ऐश्वर्याशी घटस्फोटाच्या (Dhanush Divorce) विषयावरून चर्चेत आहे. आता धनुषच्या घटस्फोटबाबत त्याचे वडील, निर्माते कस्तुरी राजा यांनी मोठा खुलासा केला आहे. हा एक कौटुंबिक वाद आहे. त्यांचं नात अद्याप संपलेलं नाही, असं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. (Dhanush Divorce)

पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्ताने सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे दोघांचेही फॅन्स निराश झाले होते. याप्रकारे अचानक १८ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात येणार, ही गोष्ट त्यांना पटणारी नव्हती. ते वेगळे होणार, या बातमीनेचं वेगवेगळे तर्क लढवले जात होते. या दरम्यान, आता धनुषचे वडील आणि निर्माते कस्तूरी राजा (Kasthuri Raja) यांनी मोठा खुलासा केला आहे.

धनुषचे वडील म्हणाले-

धनुषचे वडील कस्तुरी राजा एका मुलाखतीत म्हणाले, हा एक कौटुंबिक वाद आहे. हा घटस्फोट नाही. तर सेपरेशन आहे. जे नेहमी कुटूंब आणि कपलमध्ये असहमती आणि कौटुंबिक भांडणामुळे होतं. हेचं कारण आहे की धनुष – ऐश्वर्या वेगळे झाले आहेत. याचा अर्थ असा अजिबात नाही की, दोघे घटस्फोट घेत आहेत. धनुष आणि ऐश्वर्या दोघेही सध्या हैदराबादमध्ये आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

१७ जानेवारीला केली होती घोषणा

१७ जानेवारी रोजी धनुषने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ऐश्वर्याशी वेगळं होणार असल्याची माहिती दिली होती. यामध्ये त्याने लिहिलं होतं-'मित्र, कपल, पॅरेंट्स आणि एकमेकांचे शुभचिंतकाच्या रूपात आमची १८ वर्षांची साथ राहिली. आमचा हा प्रवास एकमेकांना समजण्याची, ॲडजस्ट करण्याची आणि सामंजस्यात राहिला. पण, आज आपण जेथे उभे आहोत. तेथून आमचे रस्ते वेगळे होतात.'

२००४ मध्ये झालं होतं लग्न

धनुष-ऐश्वर्याने अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर १८ नोव्हेंबर, २००४ रोजी लग्न केलं होतं. लग्नाचं आयोजन भव्य केलं होतं. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली होती. दोघांना दोन मुले यात्रा आणि लिंगा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT