जाणूनबुजून कोरोनाची लागण होऊ दिलेल्या गायिकेचे निधन - पुढारी

जाणूनबुजून कोरोनाची लागण होऊ दिलेल्या गायिकेचे निधन

पुढारी ऑनलाईन

जाणूनबुजून कोरोना विषाणूची लागण होऊ दिलेली गायिका हाना होर्का हिचं निधन झालं आहे. हाना होर्का कोविड-१९ ने संक्रमित झाली होती. हाना होर्का ही चेक रिपब्लिकची गायिका होती. ती ५७ वर्षांची होती.

गायिका हाना ‘Asonance’ या बँडशी संबंधित होती. काही काळापूर्वी पती आणि मुलाला कोरोना झाला होता. पण, त्यानंतर तिने त्‍या दाेघांसमवेत राहात  जाणीवपूर्वक कोरोनाची लागण करून घेतली होती.

कोराेना प्रतिबंधक लस घेतली नव्हती

हानाच्या कुटुंबीयांना लस मिळाली होती; पण तिचा विरोध होता. तिने कोविड-१९ ची लस घेतली नव्हती, अशी माहिती हानाच्या मुलाने एका रेडिओ शोमध्ये दिली होती. त्याने सांगितलं की, माझ्‍या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती माझी आई त्यांच्यासोबत राहत होती. तेव्हा तिलाही कोरोना झाला. लसीकरण विरोधी मोहिमेत ती सहभागी झाली होती.

हानाच्या मुलाने त्याच्या आईच्या मृत्यूला लसीकरण विरोधी कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवलं होतं. तो म्हणाला की, लसीकरण विरोधी आंदोलकांनी त्याच्या आईला लस घेण्यापासून थांबवलं होतं.

कोरोना संसर्गातून आपण बरे होत असल्याचंही तिने सोशल मीडियातून जाहीर केलं होतं. मात्र अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला मृत्यू झाला.

हेही वाचलं का? 

Back to top button