DL3 ‘SEX’ सीरीजवाल्या स्कूटीवरून तरुणीला घराबाहेर पडणं झालं मुश्कील 
Latest

DL3 ‘SEX’ सीरीजवाल्या स्कूटीमुळे तरुणीला घराबाहेर पडणं मुश्कील

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : DL3 'SEX' : जर तुमच्या नवीन वाहनाचा नंबर तुमच्यासाठी त्रास देणारा आणि लाजिरवाणा ठरला तर तुम्ही काय कराल याची कल्पना करा. अशीच एक घटना दिल्लीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीसोबत घडल्याचे समोर आले आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये RTO ने एका दूचाकी (Scooty) ला असा काही क्रमांक दिला आहे की, ज्यामुळे सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. आणि ती दूचाकी घेणारे कुटुंबीयही चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. त्या मुलीचे नाव (काल्पनिक) प्रीती आहे. नाव कारण त्या विद्यार्थीनीचे खरे नाव समोर आणू शकत नाही.

प्रीती ही विद्यार्थीनी दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मागच्या महिन्यात प्रीतीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाची भेट म्हणून तिला वडिलांनी स्कूटी दिली. या मोठ्या गिफ्टमुळे प्रीती खुश झाली. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं. मात्र, काही दिवसांपूर्वीपासून प्रीतीच्या वाहनाच्या क्रमांकावरून त्रास सुरू झाला. खरं तर, प्रीतीच्या गाडीला RTO कडून मिळालेल्या गाडीच्या क्रमांकाच्या मध्यभागी S.E.X अक्षरे होती.

दूचाकीवर नंबर प्लेट लावण्यासाठी गेलेल्या प्रीतीच्या भावाला पुसटशीही कल्पना आली नाही की, ही तीन इंग्रजी अक्षरे आपली डोकेदुखी वाढवेल. कारण गाडीच्या नंबर प्लेट्समधील S.E.X. ही इंग्रजी अक्षरे लोकांचे लक्षवेधून घेत आहेत आणि या नंबर प्लेटवरून नाचक्कीही सहन करावी लागत आहे. घरी परतल्यानंतर प्रितीच्या भावाने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला, जे ऐकून प्रीती घाबरली. त्यानंतर प्रीतीने वडिलांना दूचाकीचा क्रमांक बदलण्यास सांगितले. दूचाकीच्या क्रमांकावरून लोकांचे टोमणे ऐकावे लागत आहेत. त्यामुळे प्रितीला घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. प्रितीला आता तिच्या वाहनाचा नंबर बदलायचा आहे पण ते शक्य आहे का हा प्रश्न आहे. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी दिल्लीचे परिवहन आयुक्त के के दहिया यांच्याशी संवाद साधला. त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

वास्तविक, DL3C आणि DL3S सीरिजमधील वाहनांचे क्रमांक दक्षिण दिल्ली RTO द्वारे जारी केले जातात. यात, गेल्या महिन्यात DL 3 SEX सीरिजचे नवीन क्रमांक देण्यात आले. मात्र आता ही सीरिज वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. कारण या सीरिजअंतर्गत जी इंग्रजी अक्षरे दिली जात आहेत ती विचित्र आहेत. मालिकेतील इंग्रजी अक्षरांमुळे DL 3 'SEX'…. (सेक्स) सारखे शब्द बनत आहेत. याबाबत दिल्लीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या सीरिजमधील सुमारे १० हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत. पण आता एका मुलीला या सीरिजचा नंबर दिल्याने हे प्रकरण समोर आले आहे. कारण त्या मुलीच्या स्कूटीला आरटीओमधून मिळालेला क्रमांक, S.E.X अक्षरे आहेत.

आता प्रीतीच्या कुटुंबीयांना त्यांच्या स्कूटीचा क्रमांक बदलायचा आहे. पण प्रश्न असा आहे की, हे शक्य आहे का? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी दिल्लीचे परिवहन आयुक्त के के दहिया यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. ते म्हणाले, 'वाहनाचा क्रमांक दिला की तो बदलण्याची कोणतीही तरतूद नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया एका सेट पॅटर्नवर सुरू आहे.' त्याचवेळी दक्षिण दिल्ली आरटीओच्या अधिकाऱ्याशी या प्रकरणाबाबत संवाद साधला असता, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. आत्ताच्या नियमानुसार नंबर बदलता येत नाही. मात्र जर एखाद्याला त्याच्या वाहनाच्या क्रमांकामुळे अडचण येत असेल, विशेषत: ती मुलगी असेल, तर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

ते अधिकारी पुढे म्हणाले की, ज्या सीरिजबद्दल वाद आहे, ती गेल्या महिन्यातच रिलीज झाली आहे. मात्र आता अशी प्रकरणे समोर येत आहेत, ज्याची दखल घेतली जाईल. पण प्रश्न असा पडतो की ही सीरिज प्रसिद्ध करण्यापूर्वी आरटीओच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची नजर त्यावर का पडली नाही?, अशीही त्यांनी खंत व्यक्त केली. ही बाब लक्षात घेता परिवहन विभागानेही क्रमांक वाटप करण्यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिल्लीकरांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT