पुढारी ऑनलाईन डेस्क : नाना कदम लढले, तर फेस आला, मी लढलो असतो, तर काय झाले असते?, असा सवाल करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिले. तीन पक्ष विरूद्ध एक पक्ष अशी ही लढत झाली. आम्ही एकट्याने लढून तोंडाला फेस आणला, या विजयाने त्यांनी हुरळून जाऊ नये, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावर दिली. ते आज (शनिवार) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाटील म्हणाले की, तीन पक्षांनी एकादिलाने काम केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपने एकट्याने लढून ७७ हजार मते मिळवली. देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनाही पराभव स्वीकारावा लागला होता. शेवटी निवडणुकीत जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. आम्ही मतदारांचा कौल मान्य केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मतदारांनीही साथ दिली. त्या सर्वांचे आभार मानतो.
यावेळी पाटील यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करून आम्ही कुठं कमी पडलो याचा अभ्यास केला जाईल. आम्ही विकासासाठी निवडणूक लढलो. हिंदूत्व आमचा अजेंडा नाही. तर हिंदूत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्व आमचा आत्मा आहे. आम्ही हिंदूंचे राजकारण करत असताना सर्व धर्मांचा आदरही करत असतो. उद्या नाना कदमांना २ लाख लोक म्हणतील, आम्ही नाना कदमांना मतदान केलं आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा.
काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले की, आम्हाला कोणत्याही पद्धतीचा पश्चाताप झालेला नाही. उलट जयश्री जाधव यांनी छोटे मन करून भाजपसोबत आले पाहिजे होते. एक महिला आमदार झाल्याने त्यांचे मी अभिनंदन करतो. विजयावर पोस्टरबाजी सुरू आहे, यावर पाटील म्हणाले की, ज्या झाडाला चांगले आंबे असतात. लोकं तिथंच दगड मारतात. कोण मला म्हणतो पुण्यात या. कोण म्हणतो कुठे या. यावरून माझ्यावर किती जणांचे प्रेम आहे, हे लक्षात येते, असे ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?