देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य वाढ : एका दिवसात ९७५ रुग्ण, ४ मृत्यू | पुढारी

देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य वाढ : एका दिवसात ९७५ रुग्ण, ४ मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, परंतु, ही संख्या पुन्हा एकदा एक हजारांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णाच्या संख्येतही घट झाली आहे. दरम्यान, ७९६ लोक बरे झाले आहेत, तर ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात आतापर्यंत एकूण ५,२१,७४७ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

सक्रिय प्रकरणे पुन्हा वाढली

गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. परंतु सक्रिय प्रकरणांची संख्या सतत वाढत आहे, याचे कारण म्हणजे पुनर्प्राप्ती कमी झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची सक्रिय प्रकरणे ११,३६६ वर गेली आहेत. तर एकूण बरे झालेल्यांची संख्या देखील ४, २५, ०७, ८३४ वर गेली आहे. तर दुसरीकडे, एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ४,३०, ४०, ९४७ वर पोहोचली आहे.

कोरोना चाचणीत घट

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या म्हणण्यानुसार, काल भारतात कोरोना विषाणूसाठी ३,००,९१८ नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा आकडा आदल्या दिवशीच्या आकड्यापेक्षा कमी असला तरी गुरुवारी ३,६७,२१३ चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारपर्यंत एकूण ८३, १४, ७८, २८८ नमुने तपासण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. देशात कोरोना लसीचे डोस लागू केल्यानंतर लसीच्या एकूण डोसची संख्या १, ८६, ३८, ३१, ७२३ वर पोहोचली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button