मुंबई : पुढारी ऑनलाईन
शिवसैनिक अजून मजबूत आहेत. राणा यांनी शिवसेना आणि मातोश्रीला आव्हान देऊ नये. मातोश्रीला आव्हान देण्यासाठी राणा दाम्पत्य खूप लहान आहेत, असे सडेतोड उत्तर मंत्री अनिल परब यांनी दिले. ते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हनुमान चालीसा प्रकरणावरून रंगलेल्या वादावर अनिल परब बोलत होते.
परब म्हणाले, राणा यांनी त्यांच्या सोयीनुसार वेळ ठरवावी. राणा दाम्पत्य दुसऱ्यांचं स्क्रिप्ट वाचत आहेत. मातोश्री शिवसैनिकांसाठी मंदिरासारखं आहे. सेनेला आव्हान देणं सोपं नाही. मातोश्रीला आव्हान देण्यासाठी राणा दाम्पत्य खूप लहान आहेत.
मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी झालीय. मातोश्रीबाहेर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.