‘हिमालया’वरून विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मी काय करायचे ते माझे श्रेष्ठी ठरवतील’ | पुढारी

'हिमालया'वरून विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी काय करायचे ते माझे श्रेष्ठी ठरवतील'

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातून निवडणूक हरलो, तर हिमालयात जाणार. या विधानावर छेडले असता ‘मी काय करायचे, ते माझे श्रेष्ठी ठरवतील’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला. यानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्‍हणाले, “जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. शेवटी निवडणुकीत मतदारांचा कौल हा महत्त्वाचा असतो. या निवडणुकीत भाजप विकासाचा मुद्दा घेऊन उतरला होता. १५ वर्षांत त्यांनी काय काम केले. आणि आम्ही पाच वर्षात काय काम केले, हे जनतेसमोर ठेवले. भाजपने ७ वर्षात केंद्रात काय काम केले. हेही आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो. आगामी काळात आम्ही काय काम करणार आहे, हे जनतेला आम्ही सांगितले. महापूर, पूर येऊ नये म्हणून काय उपाययोजना करणार आहे”.

हेही वाचलंत का ? 

Back to top button