उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळला, विजयाचे श्रेय मी घेणं योग्य नाही : राजेश क्षीरसागर | पुढारी

उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळला, विजयाचे श्रेय मी घेणं योग्य नाही : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडी कार्यर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी या विजयावर प्रतिक्रिया दिलीय. मी फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळला आहे. विजयाचे श्रेय मी घेणं योग्य नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते पडली आहेत. तर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले भाजपच्या सत्यजित कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ७७ हजार मते पडली आहेत.

मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये एकीचे बळ दिसले. यावेळी गुलालालाची उधळण करत मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला जात आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, आम्ही भाजपला सोडलंय, हिंदुत्ववाद्यांना सोडलेलं नाही, हे आम्ही सांगत आलोय. वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्या पाठीत खंजीर खूपसून भाजपचं मतदान काँग्रेसकडे वळवलं. जनतेनं याचा बदला घेतला.

विजयाचे श्रेय कुणाला द्याल, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, या विजयाचं श्रेय मी घेणार नाही. मी फक्त ‘मातोश्री’चा आदेश पाळलाय. फेऱ्या, सभा, प्रचार करण्यात आला. जनता नेहमी माझ्या पाठिशी राहील, अशी आशा आहे.

Back to top button