Latest

BB-15 : कोण आहे तेजस्वी प्रकाश? तिचं करण कुंद्रासोबत जुळायला लागलंय?

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस -१५ मध्ये तेजस्वी प्रकाश हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, सेल्फीश नागीण म्हणून (Selfish Naagin) ती ट्रोल झाली होती. बिग बॉसच्या घरात ती डर्टी गेम खेळत असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं होतं. तेजस्वी प्रकाश हिने रोहित शेट्टी (Rohit Shetty) चा शो 'खतरों के खिलाडी' च्या १० व्या सीझनमध्ये खतरनाक स्टंट्स करून लोकांची मने जिंकली होती. आता ती सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये चर्चेत राहिलीय.

या शोमध्ये टीव्ही क्वीन एकता कपूर ही अभिनेता करण कुंद्राला म्हणाली, तेजस्वी प्रकाश आवडते का? हे ऐकून करण कुंद्रा लाजायला लागतो. करणचे हावभाव पाहून तेजस्वीदेखील लाजू लागते. पण, या प्रसंगाची मजा मात्र बिग बॉसच्या घरातील मंडळी घेताना दिसले.

कोण आहे तेजस्वी?

तेजस्वी एक इंजिनिअर आहे. तिने 'खतरों के खिलाडी-१०'मध्येही काम केलंय. रोहित शेट्टीसोबत तिची नेहमी अरग्युमेंट असायची. तेजस्वीचे कुटूंब संगीतशी संबंधित आहे. पण, ती इंजिनिअर झाली. पण, अभिनयाची आवड निर्माण झाल्याने तिने इंजिनिअरिंगची नोकरी सोडली.

१८ व्या वर्षी करिअरला सुरूवात

तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतलीय. इंजिनिअरिंगमध्ये नोकरी केली. पण, पुढे ती नोकरी सोडून अभिनयाकडे वळली. वयाच्या १८ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली.

या टीव्ही शोमधून मिळाली ओळख

तिने २०१२ मध्ये टीव्ही शो '२६१२' मधून अभिनयाला सुरुवात केली. पुढे तिने 'संस्कार-धरोहर अपनों की', 'स्वरागिनी- जोडे रिश्तों के सुर', 'पहरेदार पिया की' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' यासारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले.

अनेक रिॲलिटी शोज केले

डेली सोप्सशिवाय तेजस्वीने अनेक रिॲलिटी शोज केले आहेत. 'खतरों के खिलाडी-१०' शिवाय तिने 'किचन चँपियन ५', 'कॉमेडी नाईट्स लाईव', 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' आणि 'कॉमेडी नाईट्स बचाओ' यासारखे शोज केले आहेत.

शिविन नारंगसोबत नावाची चर्चा

'खतरों के खिलाडी १०' मध्ये भाग घेताना तेजस्वीचं नाव सह-स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता शिविन नारंगसोबत जोडलं गेलं. शोमध्ये दोघांची बॉन्डिंग पाहायला मिळाली. पण, ती याविषयी म्हणाली होती की, माहिती नाही की, फॅन्सनी माझ्या आणि शिविनमध्ये कुठलं बॉन्ड पाहिलं, पण आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.

या टीव्ही मालिेकेवर वाद

२०१७ मध्ये तेजस्वी चर्चेत आली होती. तिची टीव्ही मालिका 'पहरेदार पिया की'वर वाद निर्माण झाला होता. या मालिकेत ती एका बालकलाकारासोबत मुख्य भूमिकेत होती. तिचं लग्न एका ९ वर्षाच्या मुलाशी होतं, अशी ही कहाणी होती. पण, वाढत वाद पाहून निर्मात्यांनी ही मालिका बंद केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT