निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणीत गांजा विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एलसीबी पथकाने) गजाआड केले. सोहेल शब्बीर देसाई (वय 25) रा. शिवाजीनगर व हमीद सलमान शेख (वय 26) रा. शिवाजीनगर तिसरी गल्ली, निपाणी असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे असून दोघा संशयितकडून सुमारे 15 हजार रुपये किंमतीचा 1.50 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान गांजा पुरवठा करणारा तिसरा संशयित फरार झाला असून त्याचा शोध पथकाने जारी ठेवला आहे. ही कारवाई शहराबाहेरील निपाणी ) यरनाळ रोडवरील बिरोबा माळ येथे बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून पकडण्यात आलेले दोघे संशयित हे बाहेरून गांजा आणून निपाणी व परिसरात विक्री करीत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पथकाने निपाणी-यरनाळ रोडवर बिरोबा माळ येथे सापळा रचला.
यावेळी सोहेल व हमीद हे एका पिशवी मधून गांजा विक्री करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले. यावेळी पथकाने दोघांनाही शिताफीने पकडून चौकशी केली असता त्यांच्याजवळ1.50 किलो गांजा मिळून आला. यावेळी दोघांनीही गेल्या अनेक दिवसापासून आपण स्वतःच्या फायद्यासाठी गांजा विक्री करीत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस पथकाने तहसीलदार डाॅ. मोहन भस्मे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला.
दरम्यान आपल्याला गांजाचा पुरवठा करणारा मित्र कुडची येथील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पथकाने तिसऱ्या संशयिताचा शोध जारी ठेवला आहे.
या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर यांच्यासह एलसीबी पथकाचे पोलीस कर्मचारी उदय कांबळे, पोपट ऐनापुरे,शेखर असोदे यांच्यासह हवालदार एस.एस.चिकोडी, बसवराज न्हावी यांचा सहभाग घेतला. दरम्यान पकडण्यात आलेल्या दोघाही संशयितांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असल्याची माहिती उपनिरीक्षक गुर्लहोसूर यांनी दिली.या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
इथं शिकवतात पोह्यापासून पास्त्यापर्यंत.. ।