पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बँका १२ दिवस बंद राहतील. याअगोदर जानेवारी महिन्यात १६ दिवस सुट्या होत्या. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश होतो. (Bank Holiday Alert for February 2022)
फेब्रुवारी महिन्यात बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. देशभरातील सर्व बँका संपूर्ण महिन्यात १२ दिवस बंद राहणार नाहीत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. (Bank Holiday Alert for February 2022)
त्यामुळे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला प्रत्यक्ष भेट देण्याचा विचार करत असाल तर सुट्टीची यादी पाहिल्यानंतरच विचार करा. जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात प्रजासत्ताक दिनी बँका बंद राहतील. (Bank Holiday Alert for February 2022)
हेही वाचलत का?