sonali patil  
Latest

Bigg Boss Marathi 3 : पहिली स्पर्धक सोनाली पाटील विषयी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : देवमाणूस या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये ( Bigg Boss Marathi 3 : ) दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये ( Bigg Boss Marathi 3 :  ) या शो ची पहिली स्पर्धक आहे. देवमाणूस या मालिकेत तिने वकील आर्याची भूमिका साकारली होती. सोनाली पाटील हिने देवमाणूससोबतचं वैजू नं १ मालिकेत काम केलं आहे.

सोनाली टिकटॉक गर्ल म्हणून ओळखली जाते. ती कोल्हापूरची आहे. तिने 'वैजू नंबर वन' मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते.

सोनाली 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरलीय. महेश मांजरेकर यांनी सोनालीला तिच्या नावाची पाटी दिलीय. आता सोनालीचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास सुरु झाला आहे.

कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नुकतीच या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला सुरुवात झाली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांनी मोठ्या उत्साहात पर्वाची सुरुवात केली. त्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घराला सोनाली ही पहिली सेलिब्रिटी स्पर्धक मिळाली.

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीजन ३ सुरू झाला आहे. बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील १५ हून अधिक सेलेब्रिटीज १०० दिवसांहून अधिक दिवस शो च्या घरात राहतील.

हे कलाकारांची नावे स्पर्धक म्हणून समोर?

'कलर्स मराठी'वरील या धमाकेदार रिॲलिटी शोचे शानदार प्रोमो रिलीज झाले आहे. 'बिग बॉस'च्या घरात कोण कोण दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेय. अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, पल्लवी सुभाष, चिन्मय उदगीरकर, स्नेहा वाघ या कलाकारांची नावे समोर आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT