Aai Kuthe Kay Karte : साधी अरुंधती खऱ्या आयुष्यात कशी आहे?

Aai Kuthe Kay Karte : साधी अरुंधती खऱ्या आयुष्यात कशी आहे?
Published on
Updated on

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधती ही खूप शांत, सरळ, साधी राहणीमान असणारी आई सर्वांनाचं भावली. अरुंधतीचे खरं नाव मधुराणी गोखले-प्रभुलकर आहे. (Madhurani Prabhulkar) अरुंधती एक गुणी अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने सर्वांना भूरळ घातलीय. मधुराणी गोखले-प्रभुलकर आई कुठे काय करते! या मालिकेत डिसेंबर २०१९ पासून मुख्य भूमिकेत आहे. शांत, साधी अरुंधती खऱ्या आयुष्यातील लूक मात्र वेगळा आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी. (Madhurani Prabhulkar)

मधुराणी गोखले प्रभुलकर एक अभिनेत्री असण्याबरोबरचं गायिका आणि संगीतकारदेखील आहेत. तिचा जन्म भुसावळ येथे झाला. शिक्षण आणि बालपण पुण्यात झाले. अरुंधतीने मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनीवरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केले आहे.

तिने वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. सी-सॉ हे नाटक तिने स्वतः लिहिले आहे. या नाटकाची निर्मितीही तिनेचं केलीय. या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळालाय. पुढे तिने स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला.

तिने २००३ मध्ये झी मराठीवरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले होते. त्याच वर्षी तिने 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

तसेच 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील तिची भूमिका होती.
अरुंधतीने २००८ मध्ये झी मराठीवरील 'सा रे गा मा पा' या शोमध्ये भाग घेतला होता. ती गातेही चांगली. या शोमधून तिने गायन कौशल्याची चुणूक दाखवली.

पुढे तिने 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटात काम केले. लेकरु, नवरा माझा नवसाचा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझे घर, मणी मंगळसूत्र, जिथून पडल्या गाठी, आरोहन अशा चित्रपटात ती दिसली. इंद्रधनुष्य, यंदा कर्तव्य आहे, हिच माझी मैत्रीण, सा रे ग म प: सेलिब्रिटी स्पेशल, असंभव, अशा मालिकांमध्ये तिने काम केलंय.

खऱ्याखुऱ्या आयुष्यात इतकी सुंदर

अरुंधतीने इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती नव्या लूकमध्ये दिसत आहे. तिने यासोबत कॅप्शन लिहिलीय-हा आहे अरुंधतीचा नवा लूक' अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. फोटोमध्ये तिने ब्लॅक टी शर्ट आणि निळ्या रंगाचं डेनिम जॅकेट घातलं आहे. तिचा मॉडर्न लूक सर्वांच्याचं पसंतीस उतरतोय.

तिने जी कॅप्शन लिहिलीय, त्याचा अर्थ असा आहे की, तिच्या नव्या लुकची चर्चा व्हायला नकोय.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत नेहमी साधी साडी नेसणारी मधुरानी रिअलमध्ये ग्लॅमरस आहे. तिने करिअर करताना फोटोशूट केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news