धारावीमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; परेदशातून आलेल्या एकाला लागण | पुढारी

धारावीमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; परेदशातून आलेल्या एकाला लागण

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबईमधील ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे. टांझानियामधून परतलेल्या एकाला या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. संबंधित रुग्णाला उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएमसी प्रशासनाने दिली.

महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला आहे.

जगभर ओमायक्रॉनची दशहत निर्माण झाली असताना ही महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता ठरावी. घाबरू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि उपचार घ्या. म्हणजे तुम्ही नक्कीच कोरोनातून बाहेर पडाल, असे मनोगत या रुग्णाने व्यक्‍त केले. माझ्यासाठी 24 तास डॉक्टर उपलब्ध होते. दर दोन तासांनी माझी सर्व तपासणी करून काळजी घेण्यात येत होती, असे त्याने डिस्चार्ज मिळताना सांगितले.

वाढदिवशी सुटका दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क देशातून 24 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत परतलेला हा प्रवासी ओमायक्रॉनचा पहिला रुगण ठरला. त्याचा जीनोम सिक्वेन्स सिंग रिपोर्ट येताच त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या प्रवाशाला त्याच्या वाढदिवशीच डिस्चार्ज मिळाला.

मात्र, त्याचा वाढदिवस साजरा करूनच त्याला घरी पाठवण्यात आले. विलगीकरण केंद्रात त्याच्यासाठी खास केक मागवण्यात आला होता. पुढील आठवडाभर रुग्णास घरगुती विलगिकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुढारीला सांगितले. डोंबिवलीत नायजेरियामधून आलेल्या अन्य चार करोनाग्रस्त रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील कमालीची घटली

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील कमालीची घटली असून ती 1,668 पर्यंत पोहोचली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत 2,029 सक्रिय रुग्ण होते. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा विचार केला असता शहरात 25.88 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 1,716 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 1,668, ठाणे 1,031, नाशिक 373, अहमदनगर 356 सक्रिय रुग्ण आहेत.त्यानंतर सातारा 206, पालघर 193, रायगड 184,सोलापूर 101, औरंगाबाद 84 जिल्ह्यांमध्ये 768 (11.92 टक्के) सक्रिय रुग्ण आहेत. ओमायक्रॉनचे जेमतेम दोन रुग्ण मुंबईत असून, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचेच रुग्ण अधिक आहेत.

Back to top button