Satara crime : अल्पवयीन मित्राकडून चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार; चिमुरड्याचा मृत्यू | पुढारी

Satara crime : अल्पवयीन मित्राकडून चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार; चिमुरड्याचा मृत्यू

म्हसवे (सातारा), पुढारी वृत्तसेवा : गावाच्या हद्दीत दहावीतील १५ वर्षांच्या मुलाने आपल्या ५ वर्षीय मित्रावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून (Satara crime) केला आहे. या धक्कादायक घटनेमागे पाॅर्नोग्राफी पाहून मुलाचा खून केल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले. सातारा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून  परिसराता या घटनेने खळबळ उडाली आहे.

माण तालुक्यातील उदरनिर्वाहासटी म्हसवे या गावी राहण्यासाठी आले आहेत. ५ वर्षांच्या मृत मुलाचे कुटुंबदेखील याच परिसरातून आले आहे. कुटुंबातील वडील सेंट्रिगचे काम करतात तर, आई शेतात मजुरीचे काम करतात. ७ डिसेंबरला नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यावेळी दोन मुली आणि हा ५ वर्षांचा मुलगा घरीच होते.

सायंकाळी आई घरी आल्यानंतर मुलगा घरी होता. त्यानंतर ६ वाजता आपल्या बहिणीबरोबर नातेवाईकांकडे गेला. दरम्यान मुलाचे वडील कामावरून आले. पण, त्यावेळी मुलगा घरी नव्हता. त्यावेळी मुलगा बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मुलीला विचारल्यानंतर मुलगा रस्त्यातूनच माघारी गेला असे सांगितले.

या सर्व घटनेने गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. दरम्यान, दोन खोल्या असलेल्या घरात तो मुलगा निपचित पडला असल्याचे दिसून आले. मुलाचा श्वासोच्छवास बंद असल्याचे समोर आल्यानंतर अनैसर्गिक अत्याचार करत चिमुरड्याचा खून कुटुंबीयांनी आक्रोश केला.

घटनास्थळी काही संशयास्पद बाबी वाटल्याने तत्काळ या घटनेची माहिती तालुका पोलिसांना (Satara crime) देण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीसह पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करुन प्राथमिक माहिती घेऊन एलसीबी व सातारा तालुका पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. एलसीबी पथकाला संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एका मुलाला ताब्यात घेतले.

मुलगा अल्पवयीन असल्याने इंट्रॉगेशन स्किल वापरून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये पाठविला. पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले. तोपर्यंत मृत मुलाच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खूनाची तक्रार दिली.

ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, सपोनि अभिजीत चौधरी, फौजदार गणेश वाघ, ज्ञानेश्वर दळवी, अमित पाटील, पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम, पंकज वेसके, दादा परिहार, नितीराज थोरात, मालोजी चव्हाण, सतीश पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

… असा झाला चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

वैद्यकीय अहवालानुसार मृत झालेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले. अनैसर्गिक कृत्य होऊ लागल्याने लहान मुलगा घाबरला आणि ओरडू लागला. मुलगा ओरडू लागल्याने अश्लील कृत्य करणारा १५ वर्षांचा मुलाने घाबरून त्याचे तोंड आणि नाक दाबून धरले. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

Back to top button