भाजपशी दगा केला म्हणूनच धडा शिकवला : आशिष शेलार | पुढारी

भाजपशी दगा केला म्हणूनच धडा शिकवला : आशिष शेलार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत दगाफटका केला म्हणून त्यांना धडा शिकवला. 2019 च्या विधानसभा निकालानंतर झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी तुमच्यासोबत येतो, असे सांगून भाजपला धोका दिला. त्यामुळे त्यांना आम्ही धडा शिकवला, असे स्पष्ट मत भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी मांडले.

संबंधित बातम्या

खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेलार म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. अजित पवारांसोबतच्या शपथविधीचे काय? या प्रश्नावर शेलार म्हणाले, ज्यांनी धोका केला त्याला दंडीत करणे ही कृष्णनीती आहेे. शरद पवारांनी धोका दिला म्हत्यांना धक्का देण्याच्या रणनीतीचा तो भाग होता. आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर अजित पवारांसोबत सरकार बनविल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का, या प्रश्नावर शेलार म्हणाले, तसा कोणताही प्रस्ताव भाजपला नंबर एकचा शत्रू मानतो, असे म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ असे वाटत नाही. भविष्यात असा काही प्रस्ताव आला तर त्याला विरोधच होईल. त्यांनी कधीच राजकीय समजूतदारपणा दाखविला नाही.

Back to top button