टीम इंडियाच्या प्रॅक्‍टिस जर्सीच्या रंगावर ममता बॅनर्जी भडकल्‍या; म्‍हणाल्‍या, प्रत्‍येक गोष्‍टीचे सरकारकडून भगवीकरण | पुढारी

टीम इंडियाच्या प्रॅक्‍टिस जर्सीच्या रंगावर ममता बॅनर्जी भडकल्‍या; म्‍हणाल्‍या, प्रत्‍येक गोष्‍टीचे सरकारकडून भगवीकरण

कोलकाता; पुढारी ऑनलाईन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी टीम इंडियाच्या जर्सी वरून प्रश्न उपस्‍थित केले आहेत. ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, सर्वकाही भगव्या रंगात रंगवलं जात आहे. त्‍यांचा सर्व रोक हा भाजपवर होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपने पलटवार केला आणि ममता यांनी संपूर्ण कोलकाता शहर निळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवलंय त्‍याचं काय असा प्रश्न उपस्‍थित केला आहे.

ममता बॅनर्जी काय म्‍हणाल्‍या

मध्य कोलकाताच्या पोस्‍ता बाजारात जगधात्री पुजेसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्‍या होत्‍या, यावेळी सगळकाही भगव होत आहे. आम्‍हाला आपल्‍या भारतीय खेळाडूंवर अभिमान आहे. मला विश्वास आहे की, आम्‍ही विश्व विजेता होणार… मात्र हे खेळाडू जेंव्हा सराव करतात तेंव्हा त्‍यांच्या जर्सीचा रंग हा भगवा झाला आहे. ते पहिला निळा रंग परिधान करत होते. इतकच काय मेट्रो स्‍टेशनासुध्दा भगव्या रंगात रंगवीलं जात आहे. एकवेळा मी ऐकले होते, मायावतींनी आपली मूर्ती बनवली आहे. मात्र आता या गोष्‍टी सामान्य झाल्‍या आहेत. आता प्रत्‍येक गोष्‍टीच नाव नमो ठेवलं जात आहे. अशा गोष्‍टी स्‍वीकारल्‍या जाणार नाहीत असं त्‍या म्‍हणाल्‍या.

ममता बॅनर्जी यांनी कोणाचही नाव न घेता या कृत्‍याबद्दल निंदा केली. त्‍या म्‍हणाल्‍या, मला त्‍यांची मूर्ती उभारण्यावर कोणतीही अडचण नाही. मात्र ते प्रत्‍येक गोष्‍टीला भगव्या रंगात रगवण्याचा प्रयत्‍न करत आहेत. एका ठरावीक रंगाचा वापर करून मूर्ती उभारून कोणीही नेहमी त्‍याचा फायदा उठवू शकत नाही. सत्‍ता येत अन् जाते, मात्र ममता यांनी कोठेही भाजपचे नाव न घेता म्‍हटलं की, हा देश जनतेचा आहे. न काही एका पक्षाचा, न फक्‍त एका पक्षाच्या जनतेचा.

भाजपचा पलटवार

ममता बॅनर्जी यांच्या आरोपांनंतर भाजपने पलटवार केला. भाजप नेते शिशिर बाजोरिया म्‍हणाले, टीम इंडियाबद्दलच्या त्‍यांच्या इच्छेबद्दल आम्‍ही त्‍यांचे स्‍वागत करतो, मात्र जेंव्हा त्‍या म्‍हणातात की, टीम इंडियाचे भगवीकरण झाले आहे, कारण खेळाडू सरावावेळी भगवी जर्सी घालतात. तर मग त्‍या तिरंग्‍यावर सर्वात वर भगवा रंग असतो त्‍यावर काय म्‍हणनार? असा प्रश्न उपस्‍थित केला. सूर्याच्या पहिल्‍या किरणांचा रंग कोणता असतो? त्‍यांनी स्‍वत: हा साऱ्या शहराला निळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवले असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे. भाजन नेते दिलीप घोष म्‍हणाले, नेदरलँडचे क्रिकेट खेळाडू भगव्या रंगाची जर्सी परिधान करतात, मग काय ते हिंदू राष्‍ट्र बनले.

केंद्रावर लावला आरोप

केंद्र सरकारवर टीका करताना ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, भाजपच्या नेतृत्‍वाखालील सरकार पहिल्‍या पानावर जाहिरात छापण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यासाठी तत्‍पर असते. मात्र त्‍यांनी राज्‍याचा पैसा रोखला आहे. ज्‍यामुळे हजारो (मनरेगा) श्रमीक वंचित राहिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button