दिल्ली पोलिसांची कारवाई; आठ महिन्यांपासून फरार अंमली पदार्थ तस्कराला अटक | पुढारी

दिल्ली पोलिसांची कारवाई; आठ महिन्यांपासून फरार अंमली पदार्थ तस्कराला अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधून दिल्ली, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये पाच क्विंटल अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफियाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. कुलदीपसिंग असे या ड्रग्ज माफियाचे नाव असून तो आठ महिन्यांपासून फरार होता. आरोपीला पंजाबमधील भटिंडा येथून अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीपसिंगने मागील आठ वर्षांत ५०० किलोहून अधिक हेरॉईन आणि अफू यासारख्या अंमली पदार्थांचा साठा मणिपूरमधून वाहकांमार्फत दिल्ली, पंजाब, आसाम, यूपी, आसाम या राज्यांमध्ये पोहोचवला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आठ वर्षांपासून तो फरार होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला कुलदीपसिंग हा पंजाबमधील भटिंडा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या पथकाने कारवाई करून कुलदीपसिंगला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुख्यतः मणिपूरमधील हस्तकांमार्फत दिल्ली, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश आणि इतर प्रदेशांमध्ये अंमल पदार्थांची तस्करी करत होता. अमली पदार्थ तस्करीच्या या जाळ्याची व्याप्ती आणखी असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा 

Back to top button