पणजी : सहा केनियन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका; स्वदेशी केली रवानगी | पुढारी

पणजी : सहा केनियन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका; स्वदेशी केली रवानगी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमधून सुटका करण्यात आलेल्या सहा केनियन नागरिक महिलांना सरकारी अधिकार्‍यांनी परत पाठवले आहे.गोवा पोलिसांच्या मदतीने या महिलांची सुटका गेल्या महिन्यात एनजीओ अन्याय रहित जिंदगी (अर्ज) ने केली होती. केनियांच्या महिलांना गोव्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची तस्करी केली होती.

केनियाच्या महिलांची गोव्यात लैंगिक तस्करी रोखण्यासाठी केनियातील एका स्वयंसेवी संस्थेने अर्ज कडे हस्तक्षेपाची मागणी केली होती.
त्यानुसार अर्जने पुढाकार घेऊन या सहा महिलांचा सोडवणूक केली होती. आता सदर पीडित महिलांचे पुनर्वसन, संरक्षण आणि तस्करांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी मदत मागणार्‍या संबंधित एनजीओशी गोवा पोलीस व अर्जने संपर्क साधला आहे.

मूळ देशात पीडितांसाठी पुनर्वसन सेवा आणि त्यामध्ये आधारित तस्करांवर खटला चालवला जातो. लैंगिक तस्करीची साखळी तोडण्यासाठी सर्वाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया अर्जचे संचालक अरुण़ पांडे यांनी व्यक्त केली आहे. त्यानी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केनियातील एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला आहे,पीडितांना तस्करी करणार्‍या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या हानीपासून संरक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पीडितांना रोजगार मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य सेवांसाठी मदत करण्याची विनंती तेथील एनजीओला केली गेली आहे. अशी माहिती पांडे यांनी दिली आहे.

Back to top button