क्रांती रेडकर रामदास आठवलेंच्या भेटीला; आठवलेंकडून समीर वानखेडेंची पाठराखण | पुढारी

क्रांती रेडकर रामदास आठवलेंच्या भेटीला; आठवलेंकडून समीर वानखेडेंची पाठराखण

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने आरोपांची मालिका सुरु आहे.

नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ एक अनेक आरोप केल्यानंतर खुद्द समीर वानखेडेही आता अडचणीत आले आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबाविरोधात षड्यंत्र रचू नका, असे सुनावले. त्याचबरोबर समीर यांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांबाबत कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली.

यानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांच्यासह समीरच्या पत्नी आणि वडिलांनी पत्रकार परिषद घेतली. रामदास आठवले म्हणाले की, ‘आरपीआयच्या वतीने मी नवाब मलिक यांना समीर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र थांबवण्यास सांगू इच्छितो. समीर मुस्लीम आहे जर ते म्हणत असतील तर नवाब स्वतः मुस्लिम असूनही आरोप का करत आहेत? रिपब्लिकन पक्ष समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभा आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button