Delhi Secretariat : दिल्ली सचिवालयातून संवेदनशील प्रकरणाच्या फाईली गहाळ; विशेष सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल | पुढारी

Delhi Secretariat : दिल्ली सचिवालयातून संवेदनशील प्रकरणाच्या फाईली गहाळ; विशेष सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

नवी दिल्ली, ३ जून, पुढारी वृत्तसेवा, Delhi Secretariat : दिल्ली सचिवालयातून संवेदनशील प्रकरणांच्या फाईली गहाळ झाल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष सचिव (सतर्कता) वाय.वी.वी.जे राजशेखर यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाचे नूतनीकरण, आबकारी धोरणातील तपासासह अनेक संवेदनशील प्रकरणातील तपासाशी संबंधी सतर्कता विभागाच्या फाईली अनाधिकृतरित्या हटवण्यात आल्याचा दावा करीत तक्रार दाखल केली होती.

पोलीस दलाने गुन्हा दाखल करीत कारवाई सुरू केली आहे. १६ मे च्या मध्यरात्री तीनच्या सुमारास सचिवांच्या कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश करीत गोपनीय कागदपत्रे हटवण्यात आल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला होता. अनेक उच्च पदस्थ व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांविरोधात सुरु असलेल्या तपासासंबंधी ही कागदपत्रे होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. Delhi Secretariat

गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्ये आबकारी विभागाचे आरोपपत्र, मुख्यमंत्री संबंधी दस्तऐवज, मुख्यमंत्री निवासस्थानाचे नूतनीकरण, सूचना तसेच प्रचारासाठी देण्यात आलेला निधी,दिल्ली जल बोर्डाच्या संबंधी प्रकरणे, व्यापार तसेच कर विभागातील सोने चोरी प्रकरणासह तुरूंगाधिकारी आणि मंत्र्यांदरम्यान संबंधाच्या फाईली गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या सांगण्यावरून या फाईली गहाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. Delhi Secretariat

संबंधित बातम्या

Bomb near Golden Temple Amritsar : ‘सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब’, पंजाबमध्ये रेड अलर्ट; एका निहंगसह ४ अल्पवयीन ताब्यात

Odisha triple train crash | पंतप्रधान मोदी आज ओडिशाला जाणार, रेल्वे अपघातस्थळी भेट देऊन घेणार परिस्थितीचा आढावा

Back to top button