Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा; उदयनराजे भोसले प्राधिकरणाचे अध्यक्ष | पुढारी

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा; उदयनराजे भोसले प्राधिकरणाचे अध्यक्ष

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करत खासदार उदयनराजे भोसले हे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत, असे जाहीर केले. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे आणि शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये मंजूर केल्याची देखील घोषणा केली. स्वराज्याची राजधानी रायगड येथे 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त गडावर अनेक मान्यवरांसह कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित आहेत.

Shivrajyabhishek Sohala : प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा

स्वराज्याची राजधानी रायगडावर आज मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्या प्रसंगी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा सर्वात महत्वाची आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून प्रतापगड प्राधिकरण करण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले हे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, अशी घोषणा त्यांनी केली.

Shivrajyabhishek Sohala : मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

मुंबईची लाईफलाईन असलेल्या सागरी किमारा (कोस्टल रोड) मार्ग प्रकल्पाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली. काही दिवसांपूर्वी झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी त्यांनी याविषयी  माहिती दिली होती.  मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून याचे अनेक फायदे होणार आहे.

Shivrajyabhishek Sohala : शिवसृष्टीला ५० कोटी रुपये देणार

आमदार भरत गोगावले यांची अनेक दिवसांपासून पाचाड येथील 45 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्यासाठी खर्चाला निधी मिळण्याची मागणी होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच या शिवसृष्टीला आणखी खर्च आला तर नंतरही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या ठिकाणी आपण आपण शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील शिवसृष्टी उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखे परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

शिवाजीराजांचे विचार प्रत्येकाच्या रक्तात भिनले तर महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा प्राप्त होईल : राज ठाकरे

Shivrajyabishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या ‘या’ ३ मोठ्या घोषणा

Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

Back to top button