कोल्हापूर जिल्ह्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ

कोल्हापूर ः डॅनियल काळे उच्च रक्तदाबाचा त्रास होणार्‍या रुग्णांत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च रक्तदाब रुग्णांचे प्रमाण 24 टक्क्यांवरून27 टक्के इतके झाले आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण 34 टक्के, तर महिलांचे प्रमाण 33 टक्के आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी केलेल्या डाटा फॅक्टस् सीटमध्ये हे निदर्शनास आले आहे.

उच्च रक्तदाबाचा धोका ओळखून आता प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. शिस्तबद्ध जीवनशैली, व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवल्यास हा धोका टाळता येणे शक्य असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण 24 टक्क्यांवरून 27 टक्के इतके झाले आहे.

सिस्टॉलिक – डायस्टॉलिक

सिस्टॉलिक ः ही वरची रक्तदाबाची संख्या आहे. हृदयाचे ठोके पडताना रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरचा दाब किंवा बदल असे म्हणता येईल.
डायस्टॉलिक ः ही खालची संख्या होय. हृदयाच्या दोन ठोक्यांच्या मधल्या काळातला हा दाब असतो.

उच्च रक्तदाब म्हणजे

उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिनीवर रक्ताचा दाब येणे होय. शुद्ध रक्तवाहिन्यांमधील धमण्यांमध्ये वाहणार्‍या रक्तामध्ये दाब तयार होऊन तो धमण्यांच्या भिंतीवर येतो, त्यावेळी उच्च रक्तदाब तयार होतो.

उच्च रक्तदाबाची कारणे

वाढते वय, ताणतणाव, लठ्ठपणा, धूम—पान, तंबाखू, दारूचे व्यसन, अनुवांशिकता, जेवणात मिठाचे प्रमाण अधिक असणे, अनियंत्रित आहार ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत.

लक्षणे

घाम फुटणे, डोके दुखणे, पायाला,  सूज येणे, कारण नसतानाही अशक्तपणा जाणवणे, चालताना जिना चढताना दम लागणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत.
असे करा रक्तदाबाचे व्यवस्थापन

योग्य आणि संतुलित आहार

जागरुकता
व्यायाम व तणावमुक्त
नियमित तपासणी
मीठाचे प्रमाण कमी करा
नियमित औषधाचे सेवन
वजन कमी करा
मद्यपान, धूम—पान क नका
रोज 2 ते 4 किलोमीटर चाला
बाहेरचे पदार्थ खाणे टाळा
योगासने करा
फळांचे सेवन करा
पालेभाज्यांचा समावेश करा

रुग्णांनी नियमित रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. आहारात मिठाचे प्रमाण कमी करायला हवे. दररोज नियमित व्यायाम आणि किमान सात तास झोप घेतली, तर उच्च रक्तदाबाचा धोका आपल्याला टाळता येणे शक्य आहे. आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाणही कमी असावे.
– डॉ. अक्षय बाफना, विभागप्रमुख व हदयचिकित्सा विभाग, सीपीआर

Back to top button