Stock Market Today : गुढी पाडव्याला बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टीची सकारात्मक सुरुवात | पुढारी

Stock Market Today : गुढी पाडव्याला बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टीची सकारात्मक सुरुवात

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Today : आज बुधवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर भारतीय बाजाराची सुरुवात हिरव्या दिव्यांनी अर्थात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली सुरुवात करत निफ्टी 50 69.85 पॉइंट्स किंवा 0.41% वाढून 17,177.35 वर आणि BSE सेन्सेक्स 286.85 पॉइंट्स किंवा 0.49% वर चढून 58,361.53 वर पोहोचला. बँक निफ्टी 121.60 पॉइंट्स किंवा 0.30% वाढून 40,016.30 वर पोहोचला.

Stock Market Today : सेन्सेक्सने 50 अंकांनी वर सुरुवात करत सकाळच्या पहिल्या सत्रात चांगली तेजी दर्शवली आणि 100 अंकांनी वर आला. तर निफ्टी देखील 50 अंकांनी वाढला आहे. आज बाजारात निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, HCL टेक, इन्फोसिस, डिव्हिस लॅब, ICICI बँक आणि टेक महिंद्रा हे सर्वाधिक फायद्यात ठरले आहेत. तर कोल इंडिया, ITC, ग्रासिम, JSW स्टील आणि डॉ. रेड्डी हे नुकसानीत होते. याशिवाय हिंदुस्थान झिंक 4% वाढला आहे.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये प्रत्येकी अर्धा टक्का वाढ झाल्यामुळे ब्रॉडर मार्केट हेडलाइन पीअर्सच्या बरोबरीने वाढले. फिअर गेज इंडिया VIX 2 टक्क्यांहून अधिक 14.71-स्तरावर शांत झाला.

Stock Market Today : भारतीय बाजार उघडण्यापूर्वी सिंगापूर एक्सचेंज (SGX) वर निफ्टी फ्युचर्स 13 पॉइंट्स किंवा 0.08% वाढून 17,157.00 वर पहाटे व्यवहार करत होते. आशियाई बाजारात सकारात्मक व्यवहार होत होते. तर यूएस निर्देशांकांनी सकारात्मक क्षेत्रात रात्रभर सत्राची समाप्ती केली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर पाहायला मिळत आहे.

Stock Market Today : टाटा समूहाच्या कंपनीने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 5% वाढ केल्याने टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले आहे. टाटा मोटर्सने सांगितले की किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीच्या अधिक कठोर BS6 फेज II उत्सर्जन नियमांचे पालन करण्याच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादकाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

गुढी उभारू आनंदाची अन् चैतन्याची..!

Space War : भविष्यात अवकाशातही युद्ध; भारताला अंतराळ क्षमता विकसित करणे आवश्यक – हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी

Back to top button