कोल्हापूर : रस्त्यावर लावलेली चार बेवारस वाहने जप्त | पुढारी

कोल्हापूर : रस्त्यावर लावलेली चार बेवारस वाहने जप्त

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर बंद अवस्थेत लावलेली चार बेवारस वाहने बुधवारी जप्त करण्यात आली. महापालिकेच्या वतीने राजारामपुरी, जुना बुधवार भगतसिंग तरुण मंडळ येथे कारवाई करण्यात आली. त्याबरोबरच शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बागल चौक येथील 18 वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या होत्या. सर्व मालकांनी आपली वाहने काढून नेली.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखा व महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन जाधव, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे, अतिक्रमण निर्मूलन विभागाकडील कर्मचारी व क्रेनच्या सह्याने ही कारवाई केली.

Back to top button