गुजरातमध्ये राजकीय पक्षांना मिळाल्या १७४ कोटींच्या देणग्या | पुढारी

गुजरातमध्ये राजकीय पक्षांना मिळाल्या १७४ कोटींच्या देणग्या

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये मागील पाच वर्षांच्या कालावधीत राजकीय पक्षांना 174 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील तब्बल 163 कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्या आहेत. असोसिशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् या संस्थेकडून ही माहिती आज (दि.२८) देण्यात आली.

राजकीय पक्षांना निवडणूक बाँडच्या माध्यमातून देणग्या प्राप्त होत असतात. खासकरुन कंपन्या आणि उद्योजक बाँडच्या माध्यमातून देणग्या देतात. राष्ट्रीय पातळीवर विचार केला. तर निवडणूक बाँडच्या माध्यमातून देण्यात आलेल्या देणग्यांपैकी दोन तृतियांश देणग्या भाजपच्या वाट्याला गेलेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अर्थात वर्ष 2018 मे, ऑक्टोबर 2022 या कालावधीत गुजरातमध्ये ज्या 174 कोटी रुपयांच्या देणग्या राजकीय पक्षांना देण्यात आल्या, त्यातील 94 टक्के म्हणजे 163 कोटींच्या देणग्या भाजपला मिळाल्या. अन्य पक्षांचा विचार केला तर काँग्रेसच्या वाट्याला 10.5 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. तर आम आदमी पक्षाला 32 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button