J&K News : उधमपूर जवळ 21.5 किलो हेरॉईन जप्त, ट्रक चालक ताब्यात | पुढारी

J&K News : उधमपूर जवळ 21.5 किलो हेरॉईन जप्त, ट्रक चालक ताब्यात

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News : जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर पोलिसांनी आज झिरो पॉइंट, चेनानी येथे काश्मीरहून येणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले. हा ट्रक जप्त करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

J&K News : आज झिरो पॉइंट चेनानी येथे वाहन तपासणीदरम्यान काश्मीरहून उधमपूरच्या दिशेने येणारा ट्रक अडवण्यात आला. तपासणी दरम्यान सुमारे 21.5 किलो वजनाचे हेरॉईनची 18 पाकिटे जप्त करण्यात आली. ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एडीजीपी जम्मू, मुकेश सिंग यांनी दिली आहे.

Back to top button