IND vs SA : एकदिवसीय अन् टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल; भारतीय परंपरेने झाले स्वागत | पुढारी

IND vs SA : एकदिवसीय अन् टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल; भारतीय परंपरेने झाले स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंचे भारतीय परंपरेने स्वागत करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांचे भारतीय मुलींनी टीळा लावून आणि ओवाळून स्वागत केले. यावेळी सर्व भारतीय मुली साडी नेसून आल्या होत्या. (IND vs SA)

दक्षिण आफ्रिकेचे बरेचसे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असतात. त्यामुळे या आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय पंरपरा नव्या नाहीत. आयपीएल दरम्यान, सर्व विदेशी खेळाडूंना भारतीय संस्कृतीविषयी जाणून घेण्याची संधी मिळत असते. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेला २८ सप्टेंबरला सुरूवात होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा सामना २ ऑक्टोंबरला गुवाहाटी तर तिसरा सामना इंदौरला ४ ऑक्टोंबरला खेळवला जाईल. (IND vs SA)

एनरिच नोर्त्जे को तिलक लगाती महिलाएं

एकदिवसीय मालिका (IND vs SA)

एकदिवसीय मालिकेची सुरूवात ६ ऑक्टोंबर पासून होईल. पहिला सामना लखनौला खेळवला जाईल. दुसरा सामना ९ ऑक्टोंबरला रांचीमध्ये तर तिसरा एकदिवसीय सामना ११ ऑक्टोंबरला दिल्लीत खेळवला जाईल. दरम्यान, एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रमुख खेळताना दिसणार नाहीत. टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांसाठी आराम देण्यात आला आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनवर असेल. त्याच्या नेतृत्वात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारतासोबतचं दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील विश्वचषकाची तयारी म्हणून हि मालिका खेळणार आहे. तेम्बा बवुंमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. मात्र, विश्वचषकांत या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. (IND vs SA)

हेही वाचलंत का?

Back to top button