रायगड : पनवेलचे खड्डे कसे गोल गोल सिडको तू आमच्याशी खरे बोल | पुढारी

रायगड : पनवेलचे खड्डे कसे गोल गोल सिडको तू आमच्याशी खरे बोल

नवीन पनवेल: सचिन जाधव: पुढारी वृत्तसेवा : पावसाचा जोर वाढला आणी सिडको नोडमधील रस्त्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. रस्ते हस्तांतरण प्रकिया ही सावळा गोंधळ करणारी आहे. सध्या रस्त्यावर सर्वत्र गोल गोल खड्डे आणि खोद काम यामुळे या पाडलेल्या खड्यात पाणी साठून गोल डबकी झाली आहेत. आता हे खड्डे भरण्याचे काम कोणाचे त्यामुळे नागरिक गैरसमजात आहेत.

पावसाने आपला तडाखा लावला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढला आहे.अशात मात्र, सिडको नोडमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम म्हणावे तर मग काम केलेल्या ठेकेदारांला जाब विचारणार कोण?3 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिका खड्डे प्रकरणी एक गाणं भलतंच गाजले होते. तीच अवस्था आता महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे नक्की हे काम सिडको करणार का पनवेल महानगरपालिका या गोंधळात आहेत. सर्वत्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अशी झालेली आहे. हस्तांतरण प्रकिया कशी झाली कोणत्या मुद्द्यावर झाली पडलेल्या खड्याची जबाबदारी कोणाची सिडको का महानगरपालिका हा प्रश्न आता लोक सिडको अधिकारी यांना विचारू लागले आहेत.

पुणे : भाजप महिला आमदारांना गंडवणारे निघाले स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी!

सिडको तू आमच्याशी खर बोल. पडलेल्या खड्ड्याला जाबाबदर कोण? सिडकोकडून महानगरपालिका पनवेलला हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे, असे सांगितले जात आहे. पण हस्तांतरण प्रकिया करत असताना त्याची पूर्ण डागडूजी करून हे हस्तांतरण करणे गरजेचे होते. ठेकेदाराने ज्या रस्त्याचे काम केले आहे. त्याचा कालावधी असतो त्या अवधीमध्ये काम पूर्ण होणे गरजेचे आहे. महानगरपालिका आणि सिडको यांच्यात करार झाला आहे. त्यानंतर सिडकोने काही जबाबदारी घेतली आहेत. किती रस्ते करणार आहेत? किती रस्ते दुरुस्त केले? याचे उत्तर सिडको देत नाही. ताबा पावतीमध्ये ठरले आहे. तसे घडत नाही. सिडको उडवा उडवी करत असते. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

महापालिका नव्याने निर्माण झाली आहे. निधीची कमतरता शिवाय दुबार मालमत्ता प्रकरणी नागरिकांची नाराजी आहेच. सिडकोने आपले कर वसूल केले आहेत. त्याच मालमतेवर महानगरपालिका कर गोळा करत आहे. त्याची वसुली ही महानगरपालिका पनवेलची डोकेदुखी ठरत आहे. सिडको नोडमधील लोक कर भरत नाहीत. मग कर गोळा केला नाही तर. विकास निधी उभा करायचा कसा? साधारण 850 कोटी हून अधिकचा मालमता कर गोळा होणे आहे. त्यात वसुलीचे प्रमान फार धीम्या गतीने आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता आता महापालिका अधिकारी आणि लोक प्रतिनिधी आता पालिकेवर भरोसा ठेवा कामे होतील, असे बोलताना दिसत आहेत.
ऐन पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको नोडमधील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे सिडको ने आपली भूमिका स्पष्ट करून नागरिकांना आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. नाहीतर नागरीक पुन्हा मुंबई पालिकेच्या त्या गाण्याच्या धर्तीवर बोलतील पनवेलचे खड्डे कसे गोल गोल सिडको तू आमच्याशी खरे बोल?

सिडकोकडून आगाऊ ताबा पावती केली आहे. त्यात कोणते रस्ते पूर्ण करणार पूर्ण झालेला रस्ता त्याचा सुरक्षा कालावधी किती आहे यावर जाबाबदारी कोणाची ठरते सिडकोकडून याचे रेकॉर्ड दिले जात नाही म्हणून संभ्रम आहे. महानगरपालिकेकडे शर्ती अटी आहेत पण सिडको ने कोणते रस्ते केले- नाही केले याचे रेकॉर्ड सांगत नाहीत. आता महानगरपालिका स्वतः च हे खड्डे बजवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत आहे. उरलेले खड्डे बुजवले जातील.
संजय जगताप वरीष्ठ कार्यकारी अभियंता पनवेल महानगरपालिका

Back to top button