गारगोटी- शिंदेवाडीत भाऊबंदकीत तुंबळ हाणामारी | पुढारी

गारगोटी- शिंदेवाडीत भाऊबंदकीत तुंबळ हाणामारी

गारगोटी (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

शिंदेवाडी येथे किरकोळ कारणावरून भाऊबंदकीत कुर्‍हाड, खुरप्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन महिलांसह पाचजण जखमी झाले. परस्पराविरोधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या असून दहा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा : कोल्हापूर : आधी मम्मी, नंतर पप्पांनी घेतला अखेरचा श्वास; मुले झाली पोरकी

भगवान पाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामचंद्र पाळेकर, त्याची पत्नी लता पाळेकर, वैभवी कृष्णा पाळेकर, नीता दत्तात्रय घेवडे, विश्‍वजीत दत्तात्रय घेवडे यांनी शिवीगाळ करून फावडे मारल्याने यामध्ये भावजय सुनिता सागर पाळेकर, भाऊ सागर नामदेव पाळेकर हे जखमी झाले. याप्रकरणी सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर रामचंद्र पाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सागर पाळेकर, सुनिता पाळेकर, भगवान पाळेकर, बेबीताई नामदेव पाळेकर यांनी मारहाण केली तर सागर पाळेकर यांने कुर्‍हाडीने केलेल्या मारहाणीत वैभवी पाळेकर ही जखमी झाली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक संजय मोरे, उपनिरिक्षक अमित देशमुख, मयेकर करीत आहेत.

वाचा : कोरोनाचा मोठा विस्फोट! देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजारांवर रुग्ण, ३,४९८ मृत्यू

Back to top button