कोरोनाविरुद्धची नवी ‘रॅपिड टेस्ट’ विकसित | पुढारी

कोरोनाविरुद्धची नवी ‘रॅपिड टेस्ट’ विकसित

बोस्टन : सध्या जगभरात हाहाकार माजवत असलेल्या कोरोना संसर्गाचे झटपट निदान करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून संशोधकांनी एक नवी ‘रॅपिड टेस्ट’ विकसित करण्यात यश मिळविले. उल्लेखनीय म्हणजे या रॅपिड टेस्टमुळे अवघ्या एका तासात कोरोनासंबंधीचा अचूक अहवाल प्राप्‍त होऊ शकतो. 

अमेरिकेतील ‘मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) च्या संशोधकांच्या मते, या रॅपिड टेस्टला ‘स्टॉप कोविड’ असे नाव देण्यात आले आहे. ही चाचणी अत्यंत स्वस्त असल्याने लोक स्वत:ची कोरोना चाचणी रोज स्वत: करू शकतील. 

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार, ही नवी रॅपिड टेस्ट सुमारे 93 टक्के अचूक निदान करण्यास सक्षम आहे. सुमारे 402 रुग्णांवर या नव्या चाचणीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे अशा प्रकारची चाचणी लोक रोज घरातही करू शकणार आहेत. कारण ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. यामुळे कोरोना नामक जागतिक साथरोगावर नियंत्रण मिळविण्यास बळ मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

नवी रॅपिड टेस्ट ही क्‍लिनिक, फार्मसी, नर्सिंग होम आणि शाळा नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी कार्यरत असणार्‍या लोकांच्या संख्येचा विचार करूनच या टेस्टची किंमत एकदम कमी ठेवण्यात आल्याचे संशोधकांचे मत आहे.

Back to top button