पायलट रडल्यामुळे झाला विमानाचा अपघात  | पुढारी

पायलट रडल्यामुळे झाला विमानाचा अपघात 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन  

नेपाळमध्‍ये यावर्षी मार्च महिन्‍यात विमान अपघात झाला होता. या अपघातात ५१ लोकांचा मृत्‍यू झाला होता. हा विमान अपघात का झाला याचे नेमके कारण काय असा सर्वांना प्रश्‍न पडला होता. यासाठी नेपाळ सरकारने या अपघाताची चौकशी करण्‍याचे ठरविले होते. चार महिन्‍यानंतर या विमान अपघाताचे नेमके कारण या चौकशीत समोर आले आहे. 

ढाकाहून काठमांडू जाणाऱ्या ‘यूएस-बांग्ला’ कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. यामध्‍ये ६७ प्रवासी व चालक दलाचे चार सदस्‍य होते. १२ मार्चला हे विमान त्रिभूवन आंतरराष्‍ट्रीय विमानतळाजवळ धावपट्‍टीवरुन घसरुन फुटबॉल मैदानावर कोसळले होते. यानंतर या विमानाला आग लागली होती. यामध्‍ये ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करण्‍यासाठी नेपाळ सरकारने समिती नेमली होती. या चौकशीत अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाचा पायलट प्रवासादरम्‍यान रडला त्‍यामुळे हा अपघात झाला. पण त्‍या पायलटचे रडणे महागात पडले. कारण यामुळे ५१ लोकांना जीव गमवावा लागला. 

मिळालेल्‍या माहितीनुसार, विमानाचा पायलट कॅप्‍टन आबिद सुल्‍तान हा मानसिक तणावात होता. त्‍यामुळेच त्‍यांनी काही चुकीचे निर्णय घडले. तसेच एका तासाच्‍या या प्रवासात पायलट सुलतान सिगरेट ओढत होता. तसेच अपुर्‍या झोपेमुळे पायलट थकलेला होता असे चौकशीत समोर आले आहे. ज्‍यावेळी कॉकपिट व्हॉईस रियॉर्डरच्‍या विश्लेषणावरुन तो बोलताना रडत  होता, असे समोर आले.    

Back to top button