मेंदूची नक्‍कल करणारे उपकरण विकसित | पुढारी

मेंदूची नक्‍कल करणारे उपकरण विकसित

नवी दिल्‍ली : मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. मेंदूच आपल्या शरीराला नियंत्रणात ठेवत असतो. आता भारतीय वैज्ञानिकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एक असे उपकरण विकसित केले आहे जे मानवी मेंदूच्या क्रियांची नक्‍कल करू शकते.

मेंदूच्या ज्ञानाशी संबंधित क्रियांची हे उपकरण नक्‍कल करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने चालणारे हे एक न्यूरोमॉर्फिक उपकरण आहे. ते कुशल कम्प्युटिंग क्षमता प्राप्‍त करून मानवी मेंदूच्या कार्यप्रणालीची नक्‍कल करते. वैज्ञानिक दीर्घकाळापासून असे उपकरण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील होते जे बाह्य सपोर्टिंग (सीएमओएस) सर्किटच्या सहाय्याने काही गुंतागुंतीच्या नसलेल्या मनोवैज्ञानिक व्यवहारांची नक्‍कल करण्यास सक्षम असेल. भारत सरकारच्या विज्ञान व प्रौद्योगिक विभाग (डीएसटी) अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (बंगळूर) येथील वैज्ञानिकांनी हे उपकरण विकसित केले आहे. त्यांनी एक चेतापेशींच्या जाळ्यासारखे सुलभ, कृत्रिम सिनॅप्टिक नेटवर्क बनवण्याचा मार्ग शोधला आहे.

 

Back to top button