शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक; वर्षा बंगल्यावर कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? | पुढारी

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक; वर्षा बंगल्यावर कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक ‘वर्षा’ बंगल्यावर सुरू आहे. या बैठकीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. चार राज्यांमध्ये भाजपाची आलेली सत्ता पाहता, यावरच विषयावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील या बैठकीत उपस्थित आहेत.

कोणत्या मुद्द्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे?

१) उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांंमध्ये भाजपाने मोठं यश मिळवलेलं आहे, त्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.

२) केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जी छापेमारी सुरू आहे, त्यावरही चर्चा होऊ शकते.

३) भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी वेगाने करणार असल्याचा इशारा मोदींनी दिला, त्यावरून या बैठकीत चर्चा होऊ शकेल.

४) विधानसभेच्या अध्यक्षपदाचा जो पेच निर्माण झाला आहे, त्यावरही चर्चा होऊ शकले.

५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्या जो संघर्ष सुरू आहे, त्यावरून हिवाळी अधिवेशानतील अध्यक्षपदा तिढा सुटला नव्हता, यावर बैठकीत चर्चा होऊ शकेल.

Back to top button