ठाणे : व्हिडीओ गेम पार्लरवर धाड; गावदेवी, विलेपार्लेमध्ये १६ जणांना अटक, ८.७२ लाखांची रोकड जप्त | पुढारी

ठाणे : व्हिडीओ गेम पार्लरवर धाड; गावदेवी, विलेपार्लेमध्ये १६ जणांना अटक, ८.७२ लाखांची रोकड जप्त

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा बेकायदेशीर सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर गावदेवी व विलेपार्ले परिससरात (शनिवार) रात्री उशिरा धाडी टाकण्यात आल्या. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी केली. १६ जणांना अटक करण्यात आली असून, ८ लाख ७२ हजार ४३० रुपयांची रोकड, २ नोटबुक, ३८ व्हिडीओ गेम मशीन, २ मदरबोर्ड जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईतील गैरधंद्यांवर लक्ष ठेवून असताना समाजसेवा शाखेच्या पथकाला गावेदवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हिडीओ गेम पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी युनायटेड एण्टरप्राइझेस व्हिडिओ गेम (नॉकआऊट) पार्लरवर धाड टाकली. त्यावेळी २ जुगारी व्हिडीओ गेम खेळताना आढळून आले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी व्हिडीओ गेमचा मालक, मॅनेजर व जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.  ८ लाखांची रोकड, नोटबुक, १८ व्हिडीओ गेम मशीन, मदरबोर्ड व आरोपींना कारवाईसाठी गावदेवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, अशाचे प्रकारे विलेपार्ले परिसरातही व्हिडीओ गेम पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कानवडे व पथकाने रॉयल व्हिडिओ गेम पार्लरमध्ये धाड टाकली. त्यावेळी ८ जण गेम खेळताना आढळून आले. या कारवाईत ६१ हजार २० रुपयांची रोकड, १ नोटबुक, २० व्हिडीओ गेम मशीन, ८ जुगारी व व्हिडीओ गेमचा मालक, कामगार अशा एकूण ११ जणांना अटक करण्यात आली. या आरोपींना जप्त मुद्देमालांसह पुढील कारवाईसाठी विलेपार्ले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button