लोणावळा : गुटखा विक्रेत्याकडून 41 हजाराचा मुद्देमाल जप्त | पुढारी

लोणावळा : गुटखा विक्रेत्याकडून 41 हजाराचा मुद्देमाल जप्त

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी सायंकाळी सदर कारवाई करण्यात आली.

शिवाजी पार्कवर खासदार लेकीचा साधेपणा !

मिळालेल्या माहितीनुसार पो.ना. शरद जाधवर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांना गुप्त बतमीदाराच्या मार्फतीने बातमी मिळाली की कमलेश भोलाराम राठोड (वय 32, रा. कामशेत, मावळ) आपल्या ॲक्टीव्हा या दुचाकीवरून (क्र.एम.एच. १४ जे.बी.२८४१) गुटखा विक्री करीत आहे.

शाहरुख खानच्या ‘दुआ’ वरून विकृत मनोवृत्तीचा कळस (video)

या बातमीच्या अनुषंगाने पो. नि. प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.अमित ठोसर, पो.ना.शरद जाधवर, किशोर पवार यांनी सापळा रचित कार्ला फाटा याठिकाणी राठोड याला ताब्यात घेतले.

नाशिक : गिझर गॅस गळतीने महिला पायलटचा गुदमरुन मृत्यू

राठोड यांच्याकडून सहा हजार रुपयांचा गुटखा आणि 35 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राठोड याच्या विरुद्ध भादवि कलम 328, 188 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमाने 2011 चे कलम 26(2) (1), 26(2),(IV), 27(2),(E), 59(ii) अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पो. स. ई. बनकर हे करीत आहेत.

Back to top button