दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमधील जुहू येथिल पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ३५ वर्षीय लेखिकेवर ७५ वर्षीय व्यावसायिकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील पीडितेला कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिली आहे. त्यामुळेही घटनेला (rape case) वेगळे वळण मिळाले आहे. संबधित प्रकणाचा तपास पोलिस करत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण..
मुंबईमधील जुहू येथिल पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ३५ वर्षीय लेखिकेवर ७५ वर्षीय व्यावसायिकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. व्यावसायिकाने पीडितेला कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार अंबोली पोलिस ठाण्यात ३७६(२) एन, ५०४ भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिली असल्याने याला वेगळे वळण मिळाले आहे.
व्यावसायिकाने पीडितेकडून २ कोटी व्याजाने घेतले?
पीडितेने दावा केला आहे की, व्यावसायिकाने २ कोटी माझ्याकडून व्याजाने घेतले आहेत व ते परतही केले नाहीत. हे पैसे परत मिळावे आणि आपल्यावर झालेल्या बलात्काराविरोधात पोलिस ठाण्यात न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता, ती तक्रार मागे घ्यावी यासाठी व्यावसायिकाने चक्क दाऊद इब्राहिमच्या नावाने आपल्याला धमकावले.
पीडितीने आपल्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, व्यावसायिकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम माझा मित्र आहे व हाजी मस्तान माझ्या मेहूणीचा नवरा होता. बलात्कार (rape case) केल्याचा कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.
हेही वाचलंत का?
- Covid-19 update | देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, २४ तासांत १२,२१३ नवे रुग्ण
- आमचं ठरलंय म्हणायचं अन् सगळं घ्यायचं, हे चित्र बदलणार, खासदार धनंजय महाडिकांचा सूचक इशारा
- Aditya Thackeray : अयोध्येमध्ये भव्य महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील ; मंत्री आदित्य ठाकरे
- Pudhari : 'पुढारी'च्या प्रोत्साहनामुळे 'वॉन्लेस'च्या मदतीसाठी सरसावले हात; युके वॉन्लेस फौंडेशनच्या अध्यक्षांची भावना

