दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची महाड येथे बदली
दापोली; पुढारी वृत्तसेवा: दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची महाड नगरपरिषद येथे प्रशासकीय बदली झाली आहे. आज गुरूवारी (दि. ९) रोजी मुख्याधिकारी महादेव रोडगे हे महाड येथे जावून पदभार स्वीकाणार आहेत. रोडगे यांची संयमी आणि शांत अधिकारी म्हणून प्रशासनात एक वेगळी ओळख आहे. नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रशासनामध्ये चांगला समन्वय त्यांनी निर्माण केला हाेता.
दापोली तालुक्यातील पाणीपुरवठा, नारगोली धरणातील गाळ काढणे, शेतीला चालना, कृषी उत्पन्नाला दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत हक्काची विक्री व्यवस्था उपलब्ध करणे आणि वृक्षारोपण यासारखे अनेक कार्यक्रम राबविले आहेत. यातील नारगोली धरणातील गाळ काढून शेतीला पाणी पुरवठा करण्यास त्यांना याकार्यला मोठे योगदान मिळाले होते.
हेही वाचलं का?
- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ निर्दोष
- कोकण अतिवृष्टी : ४१ हजार कुटुंंबांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्य
- वयाची पन्नाशी ओलांडूनही अभिनेत्रींसोबत कसून रोमान्स करणारा अक्षय कुमार
- मनोहरमामा भोसले : बाळूमामांचा भक्त म्हणून घेणाऱ्या भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा
- सदनिका घोटाळा : पंकज, समीर भुजबळ यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता
पाहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या अवलियाने घरातच साकारले वस्तुसंग्रहालय

